छत्रपती संभाजीगनर : शाळा सुरू होण्यास एक दिवसाचा अवधी उरला असतानाच जिल्ह्यातील पदोन्नती मिळालेल्या १३८ मुख्याध्यापकांना पदस्थापना देण्यात आली आहे. पारदर्शकपणे राबविलेल्या या पदस्थापना कार्यक्रमात मनपसंद शाळा मिळाल्यानंतर मुख्याध्यापकांच्या आनंदाला पारावार राहिला नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. पदस्थापना मिळालेले मुख्याध्यापक पहिल्याच दिवशी रुजू होणार असल्याची माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यापकांना पदोन्नती देण्यासाठीची बैठक पार पडली. या समुपदेशन बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांची उपस्थिती होती. १३८ पैकी १३० जणांना समुपदेशाने पाहिजे ती शाळा देण्यात आली आहे. सीईओ विकास मीना यांच्या आदेशाने शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीलाच शिक्षकांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पारदर्शकपणे पदस्थानाही देण्यात आली आहे.
शिक्षक संघटनांकडून निर्णयाचे स्वागतजिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील कार्यरत शिक्षक संघटनांनी शाळा भरण्यापूर्वी पदोन्नतीसह पदस्थापना दिल्या बद्दल जिल्हा परिषद प्रशासन आणि प्राथमिक शिक्षण विभागाचे स्वागत केले. यामध्ये दिलीप ढाकणे, महेश लबडे, विजय साळकर, कैलास गायकवाड, संतोष ताठे, महेंद्र बारवाल, विठ्ठल बदर, सचिन एखंडे, संजीव देवरे, दिलीप गोरे, संजय बुचूड़े, अशोक डोळस, बळीराम भुमरे,अमोल एरंडे, मच्छिन्द्र भराडे, सचिन वाघ, आबासाहेब कणसे, मछिंद्र शिंदे, संजय भूमे,अय्यूब पटेल,अशोक निकम आदींचा समावेश आहे.