शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
2
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
3
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट
5
मारेकरी येऊन गेले होते सिद्दीकींच्या कार्यालयात, ...अन् फटाक्यांच्या आवाजात साधला नेम
6
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
7
अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी?
8
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती
9
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : एक आरोपी म्हणाला, मै 17 साल का हूँ...! त्या आरोपीचे वय २१, १९, की १७?
10
भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
11
बाबा सिद्दीकी हत्येच्या कटाचे पुणे ‘कनेक्शन’
12
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
13
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
14
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
15
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
16
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
17
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
18
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
19
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
20
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकाच गावात कुणबी नोंदीचे सापडले दीड हजार पुरावे

By विकास राऊत | Published: November 10, 2023 4:47 PM

मराठा आरक्षण: निवासी उपजिल्हाधिकारी विधाते यांच्याकडे पुरावे सादर

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावात मराठा-कुणबी नोंदीचे एकगठ्ठा सुमारे दीड हजार पुरावे आढळले आहेत. ग्रामस्थांनी त्या पुराव्यांची जंत्री आरक्षण कक्षाचे नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांना गुरूवारी सादर केली. यावेळी सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व नागरिकांची उपस्थिती होती. या पुराव्यांमध्ये निजामकालीन महसूल नोंदी आहेत. तलाठी (तत्कालीन पटवारी) यांनी मराठी, उर्दू या भाषेत घेतलेल्या नोंदी आहेत. सातबारा, भूमी अभिलेखांत कुणबी नोंदी आढळल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

मराठा आरक्षण आंदोलनानंतर ग्रामीण भागात समाजामध्ये जागृती झाली असून, आता नागरिक स्वत: सर्व जुन्या अभिलेखांचा शोध घेऊ लागले आहेत. महसूल प्रशासनाने मागील दोन महिन्यांत २३ लाख ९ हजार ६६१ अभिलेखांची तपासणी केल्यानंतर जिल्ह्यात कुणबी जातीचा उल्लेख असलेल्या ६८४ नोंदी आढळल्या होत्या. सिल्लोडमधील पुराव्यानंतर आकडा २५०० च्या आसपास जाईल. महसूल अभिलेखात ३३६, शैक्षणिक अभिलेखात २३९, कारागृह अधीक्षक १६, मुद्रांक विभाग, सेवा अभिलेखात प्रत्येकी १, भूमी अभिलेखात ९१ अशा कुणबी जातीच्या ६८४ नोंदी आढळल्या होत्या. ११ विभागातील ४४ प्रकारचे अभिलेखे प्रशासनाने तपासले असून अजूनही शोधमाेहीम सुरू आहे.

कुणबी नोंदी डाऊनलोड करता येणार....जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी नोंदीचे पुरावे प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. संकेतस्थळावर सुमारे १ हजार ६५ कुणबी नोंदींची माहिती अपलोड केली आहे. एका क्लिकवर ही माहिती मिळेल. ही माहिती डाऊनलोडही करता येईल. बुधवारपासून ही माहिती सर्वांसाठी उपलब्ध झाल्याचे विधाते यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १३७, फुलंब्रीत १३३, कन्नड १२२, खुलताबाद ५३, पैठण २७, सिल्लोड २५, सोयगाव आणि वैजापूर प्रत्येकी २१, तर गंगापूर तालुक्यात ५ दस्त अपलोड केले आहेत. अपलोड केलेल्या नोंदी डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रत सेतू सुविधा केंद्रात जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी करावयाच्या अर्जासोबत जोडावी. त्याची शहानिशा संबंधित कार्यालयाकडून केल्यावर प्रमाणपत्र वितरीत केले जाईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण