लाडसावंगी : आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली. एकूण दीडशे नागरिकांना पुरेल एवढाच लसीचा पुरवठा केंद्रात झाला. केंद्रावरच तर सुमारे तीनशे लोक जमले होते. त्यामुळे केंद्रावर सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला.
आठ दिवसांच्या खंडानंतर लाडसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी लसीचा पुरवठा करण्यात आला. लस आल्याची माहिती मिळताच, नागरिकांनी केंद्रावर गर्दी केली. विशेष म्हणजे, लसीकरणासाठी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्राबाहेरील नागरिक या ठिकाणी लस घेण्यासाठी आले होते. लस दीडशे लोकांची, हजर तीनशे लोक, त्यामुळे केंद्रावर गोंधळच उडाला. बारा बाजेनंतर लसीचा साठा संपला, अशी घोषणा कर्मचाऱ्यांनी केली असता, उपस्थित नागरिक संतप्त झाले. आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध करून दिला पाहिजे. मात्र, आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभारच याला कारणीभूत असल्याची टीका नागरिकांनी केली.
फोटो : लाडसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी जमलेल्या नागरिकांची झालेली गर्दी.
080521\1620460078446_1.jpg
लाडसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी जमलेल्या नागरिकांची झालेली गर्दी