मराठा समाजाच्या मागासलेपणाचा फायदा घेणारी राजकीय जमात आता अधिक ताकदीने कामाला लागलीय. त्यासाठी वेगवेगळ्या बॅनरखाली आंदोलने होतायेत. पण बॅनर बदलले तरी अनेक ठिकाणी एकच चेहरा सातत्याने लोकांसमोर येतो आहे. चेहरा एक व आंदोलने अनेक यामागील रहस्य नेमके आहे तरी काय? हा चेहरा पूर्वी अखिल भारतीय छावा संघटनेत दिसायचा. कोपर्डीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत निघालेल्या पहिल्या मराठा क्रांती मोर्चातही तेच पुढेपुढे. नंतर त्यांनी ‘आबां’सोबत मराठा क्रांती ठोक मोर्चा शेअर केला. काही महिन्यापूर्वी त्यांनी याच बॅनरखाली विनायकांच्या आशीर्वादाने औरंगाबादेत परिषद घेतली व परवाच्या श्रीहरी पॅव्हेलियनच्या परिषदेकडे चक्क पाठ फिरवली. कालच्या राजेंच्या संवादातही तेच. त्यांच्या वाढलेल्या अपेक्षा जोखून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मग त्यांच्याकडे पाठ फिरवली. आता राजकारण म्हटले की, हवेचा अंदाज आलाच पाहिजे. एक केरे अन् अनेक चेहरे, अशी कुजबुज या समाज वर्तुळात आता रंगते आहे.
एक केरे, अनेक चेहरे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:05 AM