दगडू ज्ञानबा कावळे (५०, रा. विटावा) हे सोमवारी रात्री घरी असताना त्यांच्या ओळखीचा कृष्णा साईनाथ शिनगारे हा कार घेऊन आला. कृष्णाने सांगितल्यावरून दगडू कावळे कारमध्ये जाऊन बसले. कारमध्ये कृष्णाचे तीन मित्रही बसलेले होते. विटावा फाटा येथे दगडू व कृष्णा या दोघात जुन्या राजकीय कारणावरून वादावादी झाली. कृष्णाने दगडूच्या कानशिलात लगावल्याने वाद वाढला. त्यानंतर कृष्णाने लाकडी दांड्याने तर त्याच्या सोबत असलेल्या तीन अनोळखींनी दगडू कावळे यांना बेदम मारहाण केली. या चौघांनी त्यांना पुढच्या वेळेस बघून घेऊ अशी धमकी देऊन पसार झाले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--------------------
४८ हजाराचे भंगार साहित्य चोरीस
वाळूज महानगर : उद्योगनगरीतील भंगाराच्या दुकानासमोर ठेवलेले ४८ हजार रुपयाचे भंगार साहित्य चोरीला गेल्याची घटना मंगळवारी (दि.१३) सकाळी उघडकीस आली.
विजय त्र्यंबक जाधव (रा.अयोध्यानगर, बजाजनगर) यांचे वाळूज एमआयडीसीतील गट नंबर ४३ मध्ये जय दुर्गा इंटरप्रायजेस हे भंगाराचे दुकान आहे. सोमवार सायंकाळी दुकान बंद करून जाधव घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दुकानात आले असता त्यांना कंपाऊंडमधील भंगाराचे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले तसेच काही साहित्य गायब असल्याचे दिसले. विजय जाधव यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
------------------------