६८८८
रुग्णांवर शहरात उपचार
४४४३
नागरिकांची गुरुवारी तपासणी
४४०११
रुग्ण आजपर्यंत शहरात पॉझिटिव्ह
३६३०९
रुग्ण बरे होऊन घरी गेले
९७८
रुग्णांचा शहरात मृत्यू
मुजीब देवणीकर
औरंगाबाद : शहरात कोरोनाची लाट आली असून दररोज तब्बल दीड हजार रुग्ण नवीन आढळून येत आहेत. जिल्ह्यात प्रत्येक ५५ सेकंदाला, शहरात प्रत्येक सव्वा मिनिटाला एक रुग्ण आढळून येत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गुरुवारी कोरोनामुळे तब्बल २९ नागरिकांचा मृत्यू झाला. प्रत्येक ५० मिनिटाला एका कोरोना रुग्णाचा मृत्यू होत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागापेक्षा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दहापट अधिक आहे. गुरुवारी ग्रामीण भागात ३९२ तर शहरात सर्वाधिक ११६५ रुग्ण आढळून आले. गुरुवारच्या आकडेवारीने मागील वर्षभरातील सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. रुग्णसंख्येचे आकडे पाहून शासकीय यंत्रणेची अक्षरश: झोप उडाली आहे.
जिल्ह्यात १५५७ रुग्ण आढळून आले. याचा अर्थ २४ तासांत प्र्रत्येक ५५ सेकंदाला एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे. गुरुवारी शहरात ११६५ रुग्ण आढळून आले. याचा हिशेब केला असता प्रत्येक एक मिनिट आणि २३ सेकंदाला शहरात एक रुग्ण समोर येत आहे. २४ तासातील ही आकडेवारी थक्क करणारी आहे.
कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू घाटी रुग्णालयात आणि काही प्रमाणात खाजगीत होत आहेत. जिल्हा प्रशासन आणि महापािलकेच्या आकडेवारीनुसार मागील चोवीस तासांमध्ये तब्बल १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ प्रत्येक एक़ तास ५०व्या मिनिटाला एक मृत्यू झाला आहे.
चौकट...
१० कोविड केअर सेंटर हाऊसफुल्ल
१ मार्चपासून शहरात रुग्ण संख्येचा विस्फोट पाहायला मिळत आहे. महापालिकेने युद्धपातळीवर रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू केले. मागील दहा दिवसांमध्ये १० सेंटर हाऊसफुल्ल झाले आहेत. ज्या रुग्णांच्या घरी राहण्यासाठी चांगली व्यवस्था आहे त्यांना त्वरित होम आयसोलेशनची मुभा देण्यात येत आहे.
शहरातील रुग्ण वाढीचा ट्रेन्ड
तारीख - रुग्ण -
१० मार्च - ४४३
११ - ६७९
१२ - ५०५
१३ - ५९५
१४ - ७९३
१५ - ९०१
१६ - १०११
१७ - ९६२
१८ - ११६५