शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

औरंगाबाद विमानतळावर तस्करीचे १ कोटीचे सोने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:09 PM

दिल्लीहून आलेल्या विमानातील दोन तस्करांकडून सुमारे एक कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. 

ठळक मुद्देअबुधाबीहून आणली होती ३ किलो सोन्याची बिस्किटेतस्करी करणारे दोन जण ताब्यात शहरातील पहिलीच मोठी कारवाई

औरंगाबाद  : येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री दिल्लीहून आलेल्या विमानातील दोन तस्करांकडून सुमारे एक कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. दिल्लीहून रात्री ८ वाजता औरंगाबादला आलेल्या एअर इंडियाच्या विमानातील शेख जावेद आणि अब्दुल फईम (रा. मुंबई) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. सुमारे एक कोटी रुपयांचे तस्करीचे सोने जप्त करण्याची ही औरंगाबादेतील पहिलीच वेळ आहे. 

कस्टमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख जावेद आणि शेख फय्युम यांनी अबुधाबीवरून ही सोन्याची बिस्किटे आणल्याची माहिती मिळाली. मुंबई कस्टमच्या अधिकाऱ्यांना हे दोन प्रवासी औरंगाबादमध्ये सोने घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावरून कस्टमचे अधिकारी औरंगाबादमध्ये आधीच येऊन थांबले होते. ही माहिती पक्की करण्यासाठी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी केंद्रीय जीएसटीच्या अधिकाऱ्यांची, त्याचप्रमाणे महसूल विभागाचीही मदत घेतली होती. 

रात्री विमानतळावर दोन्ही सोनेतस्कर उतरले. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दोघांच्या बॅग्जची तपासणी केली असता त्यामध्ये हे सोने आढळले. ८ वाजेपासून ते रात्री १२.३० वाजेपर्यंत या प्रकरणात दोघांची चौकशी चालू होती. या चौकशीदरम्यान विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अधिकारी वगळता कुणालाही विमानतळाच्या आतील बाजूस प्रवेश देण्यात आला नाही. 

शहरात या घटनेची माहिती कळताच माध्यमांचे प्रतिनिधी विमानतळावर धावले. विमानतळाच्या आतील भागात दोघांची चौकशी चालू होती. काही वेळाने सोनेतस्करीची माहिती मिळाली. आधीच्या माहितीनुसार दहा कोटी रुपयांची बिस्किटे असल्याचे समजले. मात्र, नंतर ही बिस्किटे तीन किलो वजनाची व सुमारे एक कोटी रुपयांची असल्याचे समोर आले. औरंगाबादमध्ये मंगळवारी सोन्याचा दर हा ३२ हजार १०० रुपये इतका होता. या आकडेवारीनुसार या सोन्याची किंमत सुमारे ९६ लाख रुपयांपेक्षाही अधिक होत आहे. 

शेख जावेद आणि शेख फय्युम हे दोघे औरंगाबादमध्ये कुणासाठी सोने घेऊन आले होते किंवा कुणाकडे ते सोपविणार होते, याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र, या दोघांनी आणलेले सोने हे तस्करी करून आणल्याचे समोर येत आहे. कस्टम कायद्याखाली या दोघांवर कारवाई होणार असून, ते दोघे कस्टम अधिकाऱ्यांच्याच ताब्यात राहणार आहेत.

अशी लपविली बिस्किटेया दोन तस्करांनी एका बिस्किटाचे चार तुकडे करून ती सर्व बिस्किटे एका बॅगमध्ये लपविली होती. बिस्किटाचे तुकडे पॅक करून त्याचा रोल तयार करण्यात आला होता. मात्र, कस्टम अधिकाऱ्यांना या दोघांकडे सोने असल्याची पक्की खात्री असल्याने या दोघांची तपासणी केली असता तस्करी उघडकीस 

दोन्ही गेट केले बंदसोनेतस्करांची चौकशी चालू असताना विमानतळ प्राधिकरणाकडून जालना रस्त्यावरील दोन्ही मुख्य गेट बंद करण्यात आले होते. रात्री ८ वाजता औरंगाबाद शहरात जाणाऱ्या सर्व प्रवाशांना बाहेर जाऊ दिल्यानंतर हे गेट बंद करण्यात आले.

कस्टमचा नियम कस्टमच्या नियमानुसार विदेशातून एका पुरुषाला २० हजारांचे, तर महिलेला ४० हजार रुपयांचे सोने आपल्यासोबत आणता येते. त्यापेक्षा जास्त सोने आणण्यास मनाई आहे. असे सोने आणल्यास ते जप्त करण्यात येते व कस्टम विभाग नंतर त्याचा लिलाव करून तो पैसा सरकार दरबारी जमा केला जातो. यामुळे आता शेख जावेद आणि अब्दुल फईम या दोन तस्करांकडून जप्त केलेल्या सोन्याचाही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लिलाव होईल. 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळSmugglingतस्करीGoldसोनंGST Officeमुख्य जीएसटी कार्यालयPoliceपोलिस