लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीस एक दिवसाचे वेतन दिले आहे. २८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री सहायता निधीच्या बचत खात्यावर ४ लाख ६७ हजार २४५ निधी निफ्टीद्वारे जमा करण्यात आल्याचे वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे यांनी सांगितले.मयत शेतकºयांच्या वारसांना आर्थिक सहाय्य देणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता आर्थिक मदत करणे या कामास हातभार लागावा म्हणून महाराष्ट्र शासनाने अधिकारी, कर्मचारी यांचे ऐच्छिक स्वरूपात जुलैच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याचे कळविले होते. त्यानुसार कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, शिक्षक आणि कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीस देण्यात आले आहे.दरम्यान, स्वारातीम विद्यापीठाच्या या उपक्रमाचे सामाजिक स्तरावर विविध मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वागत केले़
विद्यापीठाने शेतकरी सहायता निधीस दिले एक दिवसाचे वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:13 AM