जीएसटी कायद्यामधील होणारे बदल हे सुलभ व्हावे व व्यापाऱ्यांवर लावण्यात येणारे प्रस्तावित दंड व शिक्षा या बाबत केंद्र सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. आजच्या घडीला जीएसटीमधील नवीन कायदे व सुधारणा यामुळे व्यापार करणे अवघड होणार आहे. व त्याचा त्रास व्यापाऱ्यांना होणार असल्याने यात सुधारणा कराव्यात अशी मागणी गल्लेबोरगाव कृषी संघटनेचे अध्यक्ष विलास सुरासे, उपाध्यक्ष नानासाहेब चंद्रटिके, सचिव प्रकाश झाल्टे, सदस्य ज्ञानेश्वर सारंगधर, संजय ठेंगडे, नारायण बर्डे, विजय हरदे, महेश श्रीकांत, देविदास खोसरे, सतीश गावंडे, काकासाहेब खोसरे, बाबासाहेब खोसरे, विकास हारदे, दिलीप शिरसाट, प्रवीण मालोदे, संतोष औटे यांनी केली आहे.
फोटो : गल्ले बोरगावात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
260221\dilip misal_img-20210226-wa0044_1.jpg
गल्लेबोरगावात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.