बाजारसावंगी (जि. औरंगाबाद) : साखर कारखान्यावरील ऊसतोड बंद झाल्याने घरी परतणाऱ्या कामगारांचा ट्रक उलटून एक मजूर ठार, तर ६ जण गंभीर जखमी झाले. यात ट्रकमधील ७ बैलांनाही गंभीर दुखापत झाली. हा अपघात गुरुवारी दुपारी दोन वाजता गिरिजा मध्यम प्रकल्पाजवळील येसगाव नंबर एक येथे झाला. शेनफडू साहेबराव कांबळे (३०, रा. खंडाळा, ता. भोकरदन) असे मृत मजुराचे नाव आहे. सर्व जखमी भोकरदन तालुक्यातील रहिवासी आहेत.ऊसतोड मजूर व बैलांना घेऊन जाणारा हा ट्रक (एमएच १७- ए -५८९९) कोपरगावच्या संजीवनी साखर कारखान्याहून खंडाळा (ता. भोकरदन) येथे जात होता. अरुंद रस्त्यामुळे हा ट्रक रस्त्याच्या खाली पलटी झाल्याने यातील सर्वजण दबल्याने भर उन्हात आरडाओरड करूलागले. येसगाव येथील पोलीस पाटील शंकरराव काळे यांनी बाजारसावंगी पोलीस चौकीस अपघाताची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी दबलेल्या मजुरांना व जखमी बैलांना बाहेर काढले. बैलांवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करून घेतले. गंभीर जखमी मजुरांना रुग्णवाहिकेद्वारे फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यातील शेनफडू कांबळे यांचा उपचार सुरूअसताना मृत्यू झाला. इतर जखमींना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रकचालकास पोलिसांनी अटक केली.अरुंद रस्त्याने घेतला बळीफुलंब्री ते खुलताबाद या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरूअसून, विविध ठिकाणी रस्ता अरुंद झालेला आहे. काही ठिकाणी पुलाचे काम सुरूअसल्यामुळे धोकादायक वळणे निर्माण करण्यात आल्याने या रस्त्यावर अपघात होत आहेत.
ऊसतोड कामगारांचा ट्रक उलटून एक ठार, ६ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:12 AM