लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत निवडणूक आयोगाने एक लाख रुपयांनी वाढ केली आहे़ त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना चार लाख तर पंचायत समितीच्या उमेदवारांना तीन लाखांपर्यंत खर्च करता येणार आहे़सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे़ त्यामुळे दिवसेंदिवस रंगत वाढत आहे़ प्रचारासाठी उमेदवारांना खर्च करावा लागतो़ वाढत्या महागाईमुळे निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली मर्यादा ही अपुरी ठरत असल्याचे पाहून यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक खर्चात एक लाखाने वाढ करण्यात आली आहे़पूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवाराला तीन रुपये अशी मर्यादा होती़ आता ती चार लाख रुपये करण्यात आली आहे़ तसेच पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारास पूर्वी दोन लाखांपर्यंत खर्च करता येत असे़ आता तो खर्च तीन लाखांपर्यंत करता येणार आहे़
निवडणूक खर्चात एक लाखाची वाढ
By admin | Published: February 06, 2017 10:53 PM