बीड : ग्रामीण भागांमधील दलित वस्त्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व वाढावे, यासाठीएक हजारांवर शौचालये अपूर्णचपाणीपुरवठा विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या शौचालय योजनेचा अक्षरक्ष: फज्जा उडाला आहे. गत चार वर्षांत एक हजाराहून अधिक शौचालयांची कामे रखडलेलीच आहेत. सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्धांसाठी शौचालय बांधकामासाठी ११ हजार रुपये इतका निधी उपलब्ध केला जातो. ३ टक्के रक्कम लोकसहभागातून भरायची असून लाभार्थ्यास ९७ टक्के इतके अनुदान दिले जाते. दलित वस्त्यांमधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबियांना शौचालय बांधकामास हातभार लागावा व त्यांची शौचालयाची अडचण दूर व्हावी या उद्देशाने सुरु झालेल्या या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायत पातळीवर केली जाते. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. दरम्यान, २०१२ पासून या योजनेंतर्गत मंजूर ३ हजार ३७८ शौचालयांपैकी २ हजार २८७ शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १०९१ शौचालयांची कामे मात्र रखडलेलीच आहेत. त्यामुळे सदरील कुटुंबे शौचासाठी उघड्यावरच जात आहेत. (प्रतिनिधी)
एक हजारांवर शौचालये अपूर्ण
By admin | Published: December 20, 2015 11:25 PM