शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

एकीचा घरात, दुसरीचा गल्लीत तर तिसरीचा अश्लील छायाचित्र व्हायरल करून विनयभंग

By राम शिनगारे | Published: November 09, 2022 7:44 PM

औरंगाबाद शहरात विनयभंगाच्या तीन घटना : मुकुंदवाडी, सातारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

औरंगाबाद : एका महिलेच्या मुलीचे लग्न दुसरीकडे करण्यावरून तरुणाने घरात घुसून अश्लील शिवीगाळ केली. दुसऱ्या घटनेत एकाने गल्लीत नग्न होऊन महिलांना शिवीगाळ केली तर तिसऱ्या घटनेत महिलेची अश्लील छायाचित्रे नातेवाइकांमध्ये व्हायरल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन गुन्हे मुकुंदवाडी तर एक गुन्हा सातारा ठाण्यात नोंदविण्यात आला.

पहिल्या घटनेत मुकुंदवाडीत राहणाऱ्या फिर्यादी महिलेच्या घरी आरोपी अमित लहाने (रा. मुकुंदवाडी) हा मंगळवारी दुपारी गेला. त्याने महिलेस धमकी दिली की, तुम्ही जर तुमच्या मुलीचे लग्न दुसरीकडे केले तर मी तिला मंडपातून उचलून आणेन आणि तिच्या होणाऱ्या पतीसह तुम्हाला जीवे मारेन. महिलेने जाब विचारताच अमितने तिचा विनयभंग केला. दुसरी घटनाही मुकुंदवाडीतच घडली. मंगळवारी रात्री सचिन चाबूकस्वार (रा. तानाजीनगर, रामनगर) हा गल्लीमध्ये आला. त्याने एका महिलेच्या मुलाच्या दुचाकीला मारून खाली पाडत काच फोडली. त्यानंतर रस्त्यावर उभे राहून गल्लीतील महिलांना अश्लील शिव्या देत स्वत: नग्न झाला. या दोन्ही घटनेत मुकुंदवाडी ठाण्यात विनयभंगाचे गुन्हे नोंदविण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर आणि वैशाली गुळवे करीत आहेत.

नातेवाईक महिलेचे छायाचित्र व्हायरलसातारा ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार नितीन खरात (रा. अंबड, जि. जालना) याने नातेवाईक महिलेला ब्लॅकमेल करीत बळजबरीने नग्न अवस्थेतील व्हाॅट्सॲप कॉल करण्यास भाग पाडले. त्याशिवाय नग्न सेल्फी पाठवायला लावून त्याचे व्हिडीओ कॉलचे स्क्रीनशॉट घेऊन नातेवाइकांना पाठविल्याचा प्रकार ५ नोव्हेंबर २०२० ते ८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान घडला. याप्रकरणी ८ नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास निरीक्षक सुरेंद्र माळाळे करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद