लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात १०३१ पैकी ६९० ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यात निवडणूक पार पडली. पैकी काही ग्रामपंचायत बिनविरोधात निघाल्याने ६५५ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी शांततेत ८४.२ टक्के मतदान झाले. त्यानंतर रविवारी विश्रांतीनंतर लगेच सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला प्रत्येक तालुक्यात सुरुवात झाली. मतमोजणीसाठी निवडणूक विभागासाठी वेगवेगळे टेबलची व्यवस्था केली होती. त्यांना गावे नेमून देण्यात आली होती. वेगवेगळ्या फेरीनुसार मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे त्यांचा अंतिम निकाल दिला. त्यानंतर ध्वनिक्षेपकाद्वारे कार्यकर्त्यांना निकाल कळविण्यात आला. निकाल कानावर पडताच हजारोंच्या संख्येने मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी गुलालाची उधळण करीत आपल्या नेत्याला उचलून घेत त्यांची विजयी मिरवणूक जल्लोषात काढली. त्यामुळे परिसरात चैतन्य निर्माण झाले होते.दुस-या बाजूला विजयी उमेदवारांचा गुलाल उधळला जात असताना पराभूत उमेदवाराच्या चेह-यावरील खिन्नता लपून राहत नव्हती. पडलेली मते कानावर पडताच पराभूत उमेदवारांनी घराकडे काढता पाय घेतल्याचे चित्र पाहावयास मिळाले.पोलिसांचा फौजफाटा तैनातजिल्ह्यातील प्रत्येक मतमोजणी केंद्रावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. तसेच विशेष पोलीस पथकही राखीव ठेवण्यात आले होते. अधिकाºयांकडून कॅमे-याच्या मदतीने प्रत्येक हालचालीवर नजर होती. त्यामुळे दिवसभरात अपवादात्मक प्रकार वगळता कोठेही गालबोट लागले नाही. तसेच वाहतुकीसाठी विशेष नियोजन केले होते. बीडमध्ये तीन खिसे कापूंना ताब्यात घेतल्याचे पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी सांगितले.
कुठं दिवाळी कुठं दिवाळं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 11:45 PM