औरंगाबाद आडत बाजारात नवीन काद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि पुन्हा कांद्यात मंदी आली. विशेष म्हणजे अडतमध्ये भाव कमी झाले असले तरीही किरकोळ विक्रीत अजूनही चढ्या दरानेच कांदा विक्री होत आहे. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळपालेभाज्यांच्या अडत बाजारपेठेत नवरात्रोत्सवात आवक कमी झाल्याने कांद्याचे भाव १० ते १२ रुपयांहून वधारून २० ते २२ किलोपर्यंत जाऊन पोहोचले होते.
किरकोळ विक्रीत २५ ते ३० रुपये आवक घटल्याने कांद्याचे भाव वधारले होते; पण मागील आठवड्यात किलोपर्यंत कांदा विक्री झाला. मात्र, मागील आठवड्यात दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक सुरू झाली. यामुळे लासलगाव येथील मुख्य अडत बाजारात कांद्याचे भाव गडगडले. परिणामी, कांद्यात मंदी आली. जाधववाडीत शनिवारी १२ ते १३ रुपये किलो दर होते.