मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील २ लाख ८१ हजार पैकी फक्त २९ हजार शेतकºयांनी महा-ई-सेवा केंद्रांमध्ये नोंदणी केली असून, त्यातील २३ हजार १२४ शेतकºयांचेच अर्ज आॅनलाईन नोंदविले गेले आहेत़२०१२ पासून जिल्ह्यातील शेतकºयांना कमी-अधिक प्रमाणात नैसर्गीक आपत्तीचा सामना करावा लागत असल्याने त्यांची सातत्याने आर्थिक कोंडी होत आहे़ २०१२ ते २०१७ या पाच वर्षांत जिल्ह्यातील शेतकºयांना प्रत्येक वर्षीच्या खरीप व रबी हंगामात पेरणी करण्यासाठी कर्ज घेण्याकरीता बँकेच्या रांगेत उभे रहावे लागते़ बँकांनी पीक कर्ज दिल्यानंतरच शेतकºयांची पेरणी सुरू होते; परंतु, या पाच वर्षांत शेतकºयांनी बँकेतून घेतलेले पीक कर्ज नैसर्गीक आपत्तीमुळे फेडणे शक्य झाले नाही़ परिणामी जिल्ह्यातील शेतकरी बँकेचे थकबाकीदार झाले़ त्यामुळे शेतकºयांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला़ या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २८ जून २०१७ रोजी राज्यातील शेतकºयांना काही निकषाच्या आधीन राहून प्रती शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली; परंतु, या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे बंधनकारक केले़ त्या अनुषंगाने कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरून घेण्याची प्रक्रिया जिल्ह्यातील ९५ महा-ई-सेवा केंद्र, ३६३ आपले सरकार, २८० सीएससी केंद्र यावर २४ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे़ यासाठी १५ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे़ परभणी जिल्ह्यामध्ये एकूण ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत़शासनाने सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंर्गत २ लाख ८१ हजार शेतकरी या कर्जमाफीस पात्र ठरले आहेत़ यापैकी केवळ २९ हजार शेतकºयांनी या योजनेंतर्गत अर्जासाठी नोंदणी केली आहे़नोंद केलेल्यांपैकी केवळ २३ हजार १२४ शेतकºयांचे अर्ज या योजनेंतर्गत अपलोड झाले आहेत़ त्यामुळे केवळ २० दिवसांत तब्बल २ लाख ५७ हजार ८७६ शेतकºयांचे अर्ज छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अपलोड करून घेण्याचे खडतर आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे आहे़ जिल्ह्यातील शेतकºयांचे कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्याची खडतर प्रक्रिया प्रशासनाला कमी कालावधीत पूर्ण करावी लागणार आहे़
शेतकºयांच्या २३ हजार अर्जांचीच नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 11:58 PM