नांदेड : जिल्ह्यात पावसाचे आगमन न झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त झाला असून २४ दिवसात केवळ २५़३३ मि़मी़ पाऊस झाला आहे़ पावसाची ही टक्केवारी केवळ अडीच टक्के आहे़ गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात १४५़८१ मि़मी़ पावसाची नोंद झाली होती़ पाऊस न झाल्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून पेरण्याही खोळंबल्या आहेत़जिल्ह्यात सरासरी ९५५़५५ मि़मी़ पाऊस होतो़ गतवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता़ यंदा मात्र पावसाने दडी मारल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे़ जिल्ह्यात जवळपास ७ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र खरीपाचे आहे़ आहेत़ या क्षेत्रात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत़ तुरळक ठिकाणी धुळपेरणी शेतकऱ्यांनी उरकली आहे़ जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्नही ऐरणीवर आला आहे़ शेतकऱ्यांनी खते, बी-बियाणांची खरेदी करून ठेवली आहे़ उसनवारीवर शेतकऱ्यांनी खरेदी केली असली तरी पाऊसच होत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे़ पेरण्या लांबल्याने उत्पन्नावरही परिणाम होणार असल्याने बळीराजाच्या चिंतेत भरच पडली आहे़पाऊस लांबल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रताही वाढत चालली आहे़ जिल्ह्यात २१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ त्यात मुखेड तालुक्यातील पिंपळकुंठा अ़, वाल्मिकनगर, विठ्ठलवाडी, कोळगाव, खैरका, बावनवाडीअंतर्गत सोनपेठ वाडी तांडा व जुना अंतर्गत मानसिंग व लखुतांडा, शिरूरअंतर्गत हरिश्चंद्रतांडा, सीतारामतांडा व फत्तुतांडा, देवीनगर-प्रभुनगरतांडा, भवानीनगरतांडा, यशवंतनगरतांडा, लोहा तालुक्यातील मडकी, शेवडी बा.तांडा, उमरा अ़ फुलवळतांडा, परसरामतांडा, रूपसिंगतांडा, उमरा नवी आबादी, कंधार तालुक्यातील उस्माननगर, हरीला तांडा, भोकर तालुक्यातील कामनगाव, किनवट तालुक्यातील मारेगाव, रामपूर-भामपूर आणि हिमायतनगरचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)सर्वाधिक पाऊस धर्माबाद तालुक्यातजिल्ह्यात १ जून ते २४ जूनपर्यंतची पावसाची नोंद पाहता धर्माबाद तालुक्यात सर्वाधिक ६६ मि़मी़ पाऊस झाला आहे़ नांदेड तालुक्यात १०़६२ मि़मी़, मुदखेड ८़६६, अर्धापूर ४, भोकर ३५़९५, उमरी १३़३७, कंधार ४५़६६, लोहा २७़१७, किनवट २७़८६, माहूर २५़५०, हदगाव ८़४९, हिमायतनगर १०़३४, देगलूर २६़१८, बिलोली २५, नायगाव १९़८० मि़मी़ आणि मुखेड तालुक्यात ५०़७२ मि़मी़ पाऊस झाला आहे़ जिल्ह्यात झालेला एकूण पाऊस हा ४०५़३२ मि़मी़ असून तो सरासरीत २५़३३ मि़मी़ आहे़ या पावसाची टक्केवारी ही केवळ २़६५ टक्के आहे़
जिल्ह्यात केवळ २५ मि़मी़ पाऊस
By admin | Published: June 24, 2014 12:39 AM