शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शेतीमाल आवक केवळ २५ टक्के

By admin | Published: November 08, 2015 11:44 PM

रमेश शिंदे , औसा पावसाअभावी यंदा शेतकरी संकटात सापडले आहेत़ त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेले व्यवसायही संकटात सापडले आहेत़ पाऊस नसल्याचा फटका

रमेश शिंदे , औसा पावसाअभावी यंदा शेतकरी संकटात सापडले आहेत़ त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेले व्यवसायही संकटात सापडले आहेत़ पाऊस नसल्याचा फटका जसा शेतकऱ्यांना बसला तसा तो आडत बाजारासही बसला आहे़ दिवाळीच्या पूर्वसंध्येला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सुनसान असल्याचे शुक्रवारी पहावयास मिळाले़ दिवसभरात केवळ ४१० क्विंटल शेतीमालाची आवक झाली होती़ मागील आठ-दहा वर्षांपासून औसा कृषी उत्पन्न बाजार समिती नावारूपाला आली आहे़ या बाजार समितीत महिन्याला हजारो क्विंटल आवक राहायची़ पण यावर्षी मात्र ही आवक २५ टक्क्यांवरच आली आहे़ मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात १८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक होती़ ती यावर्षी केवळ ६ हजार ५०० क्विंटलवर आली आहे़ मागील वर्षी दिवाळीच्या पूर्वसंध्येला सर्व प्रकारच्या शेतीमालाची आवक ३ हजार ५०० क्विंटलची होती़ ती आज केवळ ४१० क्विंटल आहे़ शुक्रवारी औशाच्या आडत बाजारात केवळ ४१० क्विंटल मालाची आवक होती़ यामध्ये सोयाबीन ३३५, हरभरा ३, हायब्रीड ४३, पिवळी २४, करडी २, सूर्यफूल ३ क्विंटल अशी आवक होती़ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये ५४ आडत दुकाने आहेत़ विशेष म्हणजे मालाची आवकच नसल्याने काही आडत दुकाने बंद असल्याचे विदारक चित्र पहायला मिळाले़ हजारो क्विंटल आवक असणाऱ्या या बाजार समितीमधीलआवक सध्या मात्र शेकड्यात आली आहे़ यासंदर्भात बाजार समितीचे सचिव शाम कुलकर्णी म्हणाले, मागील काही वर्षांपासून आमच्या बाजार समितीत हजारो क्विंटल शेतीमालाची आवक होत होती़ ती आता शेकड्यावर आली आहे़ त्यामुळे यावर्षी ३५ ते ४० टक्केही उत्पन्न होते की नाही, अशी शंका आहे़ त्यामुळे आर्थिक उलाढाल थंडावली आहे़ दुष्काळी परिस्थितीचा हा परिणाम आहे़