शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

अवघे २६ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध

By admin | Published: May 31, 2016 11:23 PM

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून सुमारे ४ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून सुमारे ४ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी बी-बियाणे तसेच खताची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. सर्वाधिक पेरा होणाऱ्या सोयाबीन, तूर, उडीद आणि खरीप ज्वारीचे मिळून ८३ हजार ६६ क्विंटल बिण्याची मागणी नोंदविण्यात आली असता आजघडील केवळ २५ हजार ५२५ क्विंटल एवढेच बियाणे उपलब्ध झाले आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीवर भर दिला होता. परंतु, पावसाने दगा दिल्यामुळे साधा उत्पादन खर्चही निघाला नाही. यंदाही शेतकरी सोयाबीनवर भर देतील, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ४८ हजार हेक्टर एवढे असले तरी प्रत्यक्ष १ लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी होईल, असे कृषी विभाभागाचे म्हणणे आहे. यासाठी महाबीज तसेच राष्ट्रीय बियाणे निगम यांच्याकडून सुमारे ७२ हजार ८०० क्विंटल बियाणाची मागणी करण्यात आली आहे. आजवर केवळ २३ हजार १८४ क्विंटल म्हणजेच पन्नास टक्केही बियाणे उपलब्ध झालेले नाही. अशीच अवस्था तुरीच्या बियाण्याबाबत आहे. ८४ हजार ४०० हेक्टर एवढे सर्वसाधारण क्षेत्र आहे. प्रत्यक्षात ९८ हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावर पेरणी होईल. तसे कृषी विभागाकडून प्रस्तावित करण्यात आले आहे. ४ हजार ११६ क्ंिवटल बियाणे मंजूर असतना सद्यस्थितीत अवघे ५०४ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. भूम, वाशीसह आदी तालुक्यांतील शेतकरी नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या उडीद पेरणीवर भर देताता. सर्वसाधारण क्षेत्र ४३ हजार ५०० हेक्टर एवढे आहे. प्रत्यक्षात ५० हजार हेक्टवर पेरणी होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यानुसार ३ हजार ९०० क्विंटल बियाणे पुरविण्यास शासनाने मंजुरी दिली असली तरी प्रत्यक्षात १ हजार ४०७ क्विंटल बियाणेच उपलब्ध झाले आहे. खरीप ज्वारी पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ६६ हजार हेक्टर एवढे आहे. प्रत्यक्षात ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आली आहे. यासाठी २ हजार २५० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली असता प्रत्यक्षात अवघे ४३० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. (प्रतिनिधी)