शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

साडेतीन हजार पोलिसांसाठी अवघी ३२९ वाहने; आरोपींची ने-आण करण्यासाठी वाहनांची प्रतीक्षा

By सुमित डोळे | Published: August 17, 2024 8:09 PM

४० टक्के वाहने द्यावी लागतात अन्य विभागांच्या कामकाजासाठी, ७५ वाहनांची गरज

छत्रपती संभाजीनगर : कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस विभागात वाहनांची वानवा निर्माण झाली आहे. जवळपास साडेतीन हजार पोलिसांसाठी अवघी ३२९ वाहने आहेत. त्यापैकी ४० टक्के वाहने अन्य विभागांना वापरण्यासाठी दिली आहेत. परिणामी, ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासकीय कामांसाठी तासन् तास प्रतीक्षा करावी लागते आहे.

पोलिस विभागाकडील बहुतांश वाहने अत्यंत खराब अवस्थेत आहेत. दहा वर्षांपेक्षा अधिक वापर झालेली वाहने ‘खटारा’ बनली असून पोलिसांनाच धक्का मारून चालू करावी लागतात. नुकतेच एका ठाण्यातील अधिकाऱ्याला गुन्हेगारांना न्यायालयात हजर करायचे होते. दुपारी ३.३० वाजल्यानंतरही त्यांना वाहन उपलब्ध झाले नव्हते. मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने ठाण्यातील इतर वाहने बंदोबस्तात पाठवली होती. उशीर झाल्यावर न्यायालयात काय उत्तर द्यावे, या प्रश्नाने अधिकारी चांगलाच वैतागला होता. शहरातील ७० टक्के पोलिस ठाण्यांची हीच अवस्था आहे. डायल ११२ च्या वाहनांचा वापरही अन्य कामांसाठी करण्यास बंदी असल्याने अनेकदा स्वत:च्या वाहनात गुन्हेगारांची ने-आण करावी लागते.

अशी आहे वाहनांची संख्याशहर पोलिसएकूण वाहने - सुस्थितीत - निकामीदुचाकी - २३३ - १५८ - ९७ चारचाकी - २६५ - १७१ - ७५ --

जिल्हा पोलिसांकडे २९५ वाहनेजिल्हा पोलिसांकडे देखील वाहनांची वानवा आहे. असलेली सर्व वाहने सुस्थितीत आहे. एकूण २९५ वाहनांपैकी १४८ चारचाकी तर १४७ दुचाकी आहेत.

४० टक्के वाहने इतरांसाठीशहर पोलिसांच्या ३२९ वाहनांपैकी ४० टक्के वाहने एसीबी, सीआयडी, नागरी हक्क सुरक्षा विभाग, रेल्वे पोलिस, एटीएस, विशेष सुरक्षा पथक, लोहमार्ग पोलिस वापरतात.

७५ वाहनांची गरजछत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयाची स्थापना १९ ऑक्टोबर १९९१ ला झाली. या ३३ वर्षांत १८ पाेलिस ठाणी, गुन्हे शाखा, सुरक्षा विभाग, पासपोर्ट विभाग, भराेसा सेल, पर्यटक सुरक्षा विभाग, दामिनी पथक अशी सहा पथके वाढली. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या साडेतीन हजारांच्या घरात आहे. वाहने मात्र वाढलीच नाहीत. सध्या ७२ वाहनांची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जूनमध्ये मिळाली ४ कोटींची वाहनेजून, २०२३ मध्ये पोलिसांना ४ कोटी १६ लाखांची ८ स्कॉर्पिओ, १८ बोलेराे, १ टेम्पो, ५ मिनी सियाज, १७ आसनांची ४ वाहने मिळाली. यापैकी बहुतांश वाहने वरिष्ठ अधिकाऱ्यांना गेली. ठाण्यांच्या नियमित कामांसाठी पुरेशी वाहने नाहीत.

६९ वाहनांसाठी प्रयत्नपोलिस वाहनांचा २४ तास वापर होतो. गतवर्षी जिल्हा नियोजन निधीतून वाहने मिळाली होती. अजून ६९ वाहनांसाठी प्रस्ताव पाठवला असून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- शिलवंत नांदेडकर, पोलिस उपायुक्त, मुख्यालय.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद