औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात १४४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरात अवघे ३७, तर ग्रामीण भागातील १०७ रुग्णांचा समावेश आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना मृतांची संख्या एकेरी आकड्यात राहिली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ८ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अहमदनगर जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या २ हजार ९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४४ हजार २३५ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३८ हजार ८४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,३०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १४३ आणि ग्रामीण भागातील ६१, अशा २०४ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना पैठण येथील ७८ वर्षीय महिला, पाटेगाव, पैठण येथील ७० वर्षीय महिला, पिशोर, कन्नड येथील ८८ वर्षीय महिला, रांजणगाव, वाळूज येथील ७५ वर्षीय महिला, देवगाव, कन्नड येथील ८२ वर्षीय महिला, सिडकोतील ५० वर्षीय पुरुष, अरिहंतनगर येथील ६४ वर्षीय पुरुष, हस्ता, कन्नड येथील ४७ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
सातारा परिसर १, घाटी १, नक्षत्रवाडी १, कांचनवाडी १, जवाहर कॉलनी १, पडेगाव १, चिकलठाणा १, मुकुंदवाडी १, म्हाडा कॉलनी १, राजीव गांधीनगर १, विष्णूनगर २, जुना मोंढा, भवानीनगर १, सिद्धार्थनगर टी.व्ही. सेंटर २, संभाजीनगर, हर्सूल १, द्वारकानगर १, पिसादेवी रोड, हर्सूल २, सारारिद्धी, हर्सूल १, मौर्या पार्क, हर्सूल १, जुना मोंढा २, एन-११ येथे १, मिटमिटा, पडेगाव १, अन्य १२.
ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर ५, देऊळगाव, ता. सिल्लोड १, कन्नड १, कसारखेडा, ता. खुल्ताबाद १, फुलंब्री १, अलीवाडा २, चिंचोली तांडा १, वाळूज २, अन्य ९३.