शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

छत्रपती संभाजीनगरच्या १७ लाख लोकसंख्येसाठी अवघे ३,८०० पोलीस अधिकारी- कर्मचारी

By सुमित डोळे | Published: September 16, 2023 1:00 PM

अनुशेष कधी भरणार? ५५५ नागरिकांच्या मागे केवळ एक पोलिस, मग शहर सुरक्षित राहील कसे?

छत्रपती संभाजीनगर : गेल्या दहा वर्षांमध्ये शहराची लोकसंख्या १७ लाखांच्या घरात गेली. दोन मोठ्या औद्योगिक वसाहतींच्या मधोमध वसलेल्या शहराच्या प्रत्येकी ५५५ नागरिकांच्या मागे मात्र एकच पोलिस आहे. यंदा आठ महिन्यांमध्ये गुन्ह्यांची संख्या पाच हजार ६३२ झालेली असताना शहराच्या सुरक्षेची असलेल्या शहर पोलिस विभाग मात्र अद्यापही केवळ ३,८०० कर्मचारी, अधिकाऱ्यांचा आहे. यामुळे कायदा, सुव्यवस्था राखण्यात पोलिस विभाग अपुरा पडत आहे. त्यामुळे गृह विभाग यंदा तरी हा पोलिस विभागाचा अनुशेष भरून काढणार का, याकडे पोलिस आस लावून आहेत.

शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्या जबाबदारीसह प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस विभागाची आहे. १९९१ मध्ये अधीक्षक ते पोलिस आयुक्तालयात रूपांतर झाल्यानंतर शहरात आजपावेतो एकूण १८ पोलिस ठाणी बनली. तीन वर्षांपासून शहर पोलिस दलाच्या हद्दवाढीचा प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे प्रलंबित असताना कर्मचारी वाढीचा प्रस्तावदेखील अद्याप मंजूर झालेला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुंडलिकनगर व वेदांतनगर पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली. मात्र, त्यासाठीचा आवश्यक वाढीव अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव मात्र अद्यापही प्रलंबित राहिला. परिणामी, आहे त्या संख्येतच पोलिस विभागाला कामकाज करावे लागत आहे.जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १०,१०० चौ. किलोमीटर त्यापैकी १४१.१० चौ.कि.मी. हे शहरी क्षेत्र आणि ९,९५८.९० चौ. कि.मी. हे ग्रामीण क्षेत्र आहे.

असा आहे सध्याचा पोलिस विभाग- १९ ऑक्टोबर, १९९१ मध्ये पोलिस आयुक्तालयाची स्थापना.- एकूण १८ पोलिस ठाणी.- १९९३ मध्ये सर्वाधिक ९५० पोलिसांची भरती. त्यानंतर मेगा भरतीच नाही.- एक पोलिस आयुक्त, तीन उपायुक्त, पाच सहायक आयुक्तांसह २९ पोलिस निरीक्षक.- सध्या तीन हजार ८०० पोलिस. त्यापैकी तीन हजार ३०० च्या आसपासच सक्रिय.- वाहतूक विभागात केवळ ३५० कर्मचारी.

२०२३ (सप्टेंबर) पोलिस ठाणेनिहाय गुन्ह्यांची संख्यामुकुंदवाडी - ३९५, एमआयडीसी सिडको - ४५०, सिडको - ६१५, हर्सूल - १९९, जिन्सी - २७१, जवाहरनगर - २२५, सातारा - २८४, उस्मानपुरा - १७२, सिटी चौक - ३२७, बेगमपुरा - २०५, क्रांती चौक - २९५, वेदांतनगर - १८२, छावणी - ४३८, वाळूज - २९३, पुंडलिकनगर - ३४१, एमआयडीसी वाळूज - ७७३, दौलताबाद - १५७, सायबर पोलिस ठाणे - १०= एकूण - पाच हजार ६३२२०२३ मध्ये - १४ हजार ३२६ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद२०२२ मध्ये एकूण ७ हजार १७४ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद

हे प्रस्ताव अद्यापही कागदावरच- क्रांती चौक पोलिस ठाणे व कर्मचारी निवासस्थाने.- जिल्हा पोलिसांचे अत्यंत दयनीय अवस्थेतले कर्मचारी निवासस्थान.- हद्दवाढ करून बिडकीन, शेंद्रा औद्योगिक वसाहतीचा आयुक्तालयात समावेश.- सातारा, एमआयडीसी वाळूज हद्दीमध्ये बदल.- दोन उपायुक्तांची पदे मंजूर, परंतु अद्यापही अधिकारी नियुक्त नाही.

अवस्था बिकट, काम करणेही अवघड- शहर पोलिस दलाकडे असलेल्या ३,८०० कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत.- यापैकी मुख्यालय, नियंत्रण कक्ष व अन्य दैनंदिन प्रशासकीय कामांमध्ये जवळपास ६०० कर्मचारी.- एका कुटुंबात किमान तीन वाहने, परंतु वाहतूक कर्मचारी मात्र अवघे ३५०.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस