लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्रीसाठी सातबाराची आॅनलाईन नोंदणी करण्यास शेतकºयांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असून, बुधवारपर्यंत केवळ ३९७ शेतकºयांनीच नोंदणी केल्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही खरेदीला प्रारंभ झाला नाही़राज्य शासनाने शेतीमालासाठी हमीभाव जाहीर केला आहे; परंतु, खुल्या बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दराने मालाची खरेदी होते़ यात शेतकºयांचे नुकसान होत आहे़ त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करून या केंद्रावरून शेतीमाल खरेदी करण्याचे धोरण मागील काही वर्षांपासून शासनाने अवलंबिले आहे़या धोरणात यावर्षी काहीसा बदल करण्यात आला़ त्यानुसार शेतकºयांना त्यांच्या शेतातील पीक पेºयाची आॅनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे़ यात संबंधित शेतकºयांना असलेल्या संपूर्ण शेतीचा पीकपेरा तलाठ्यामार्फत प्रशासनाकडे द्यावयाचा आहे़एखाद्या शेतकºयाला १० एकर शेती असेल तर त्या संपूर्ण वर्षात खरीप व रबी हंगामामध्ये क्षेत्रनिहाय पेरलेल्या पिकांची माहिती सातबारा उताºयामध्ये नमूद करावयाची आहे़ ही आॅनलाईन नोंदणी झाल्यानंतरच खरेदी केंद्रामार्फत संबंधित शेतकºयाला मोबाईलवर संदेश पाठवून त्याचा शेतीमाल हमीदराने खरेदी केला जाणार आहे़आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन एक ते दीड महिन्यांपूर्वी करण्यात आले होते़ जिल्ह्यात सुमारे ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत़ या सर्व शेतकºयांना आॅनलाईन नोंदणी करावयाची आहे़ परंतु, प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ ३९७ शेतकºयांनीच नोंदणी केली आहे़ त्यात जिंतूर तालुक्यात ९५, मानवत तालुक्यात १७०, सेलू १००, गंगाखेड ७ आणि परभणी तालुक्यामध्ये २५ शेतकºयांची नोंदणी झाली आहे़ त्यामुळे नोंदणी झालेल्याच शेतकºयांना खरेदी केंद्रामार्फत मोबाईलवर संदेश जाणार असून, त्यांचा शेतीमाल हमीभावाने खरेदी केला जाणार आहे़परभणी जिल्ह्यात लाखो शेतकरी असताना नोंदणी होत नसल्याने या शेतकºयांच्या शेतीमालाला हमीभाव मिळेल की नाही? हाही प्रश्न निर्माण होत आहे़
केवळ ३९७ शेतकºयांनी केली नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:28 AM