शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

मराठवाड्यातील धरणांत फक्त ४७ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:04 AM

औरंगाबाद: मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्प क्षेत्रांसह गोदावरी पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे जायकवाडीसह विभागातील अनेक धरणे सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ...

औरंगाबाद: मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्प क्षेत्रांसह गोदावरी पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे जायकवाडीसह विभागातील अनेक धरणे सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. विभागात ८७९ प्रकल्पांत फक्त ४७ टक्के पाणीसाठा आहे. ११ मोठ्या प्रकल्पांत ५३ टक्के पाणी असून, सर्व धरणांची तहान वाढू लागली आहे. त्यातल्या त्यात ऑगस्ट महिना आतापर्यंत कोरडाठाक आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत पावसाचे पुनरागमन होईल, असे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत.

नाशिकपासून औरंगाबादपर्यंतच्या गोदावरी नदी पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारलेली आहे. त्यामुळे विभागातील गोदावरी नदी पात्रावरील विष्णुपुरी वगळता सर्व प्रकल्पांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. कोकणासह पुणे विभागातील काही जिल्ह्यांत महापुराने थैमान घातले तर नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जलप्रकल्प क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे निसर्गाचा असमतोल यंदाच्या पावसाळ्यात दिसतो आहे. विभागातील सर्व ८७९ प्रकल्पांत ३ हजार ७९६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. ८ हजार १९७ दलघमी पाणी साठवण क्षमता या प्रकल्पांत आहे. मोठ्या प्रकल्पांत क्षमतेच्या तुलनेत ५३ टक्केच जलसाठा असल्यामुळे विभागाची चिंता वाढली आहे. पावसाळ्याचे फक्त ४८ दिवस उरले आहेत. आता परतीच्या पावसावरच सगळी मदार असल्याचे बोलले जात आहे.

५६०० दलघमी पाणीसाठ्याची तूट

११ मोठ्या प्रकल्पांत २ हजार ७९८ दलघमी उपयुक्त साठा आहे. मागच्या वर्षी ३०२० दलघमी पाणी मोठ्या प्रकल्पांत होते. सुमारे १२०० दलघमीची तूट मोठ्या प्रकल्पात आहे. ५६०० दलघमी पाण्याची तूट सर्व ८७९ प्रकल्पांत आहे. या प्रकल्पांत ३ हजार ७९६ दलघमी पाणीसाठा सध्या आहे. मोठ्या ११ प्रकल्पांवरच विभागातील ६० टक्के भूभागाची तहान भागते. त्यामुळे या प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. विभागातील आठही जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत आजवर ६९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. चार मोठ्या प्रकल्पात ६० टक्क्यांच्या पुढे जलसाठा आहे. जायकवाडीत फक्त ४० टक्के साठा आहे.

मराठवाड्यातील जलसंपदा अशी

प्रकल्प संख्या जलसाठा

मोठे प्रकल्प ११ ५३ टक्के

मध्यम प्रकल्प ७५ ३९ टक्के

लघू प्रकल्प ७५३ ३१ टक्के

गोदावरीनदी बंधारे १५ ५० टक्के

तेरणा व बंधारे २५ ४८ टक्के

एकूण ८७९ ४७ टक्के