औरंगाबाद : मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा अतिशय भयावह जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील बहुतांश जलप्रकल्प तळाला गेले असून, काही प्रकल्प आटले आहेत. मोठ्या, मध्यम, लघुप्रकल्प बंधाऱ्यांत फक्त ६.५० टक्के इतका पाणीसाठा आहे. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न पावसाळ्यापर्यंत असणार आहे.विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत ६.५३ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांत ५.९५ टक्के, तर ७४९ लघु प्रकल्पांत ५.७४ टक्के पाणीसाठा आहे. १३ बंधाऱ्यांत १३.२० टक्के, तर उर्वरित इतर २४ बंधारे आटले आहेत. नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासन नियोजन करण्याचे प्रयत्न करीत आहे.कधी नव्हे एवढे टँकर मार्च महिन्याच्या सुरुवातीला विभागात सुरू असून १५३९ टँकरने आठ जिल्ह्यांतील २५ लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो आहे. येणाºया आठ दिवसांत १६०० च्या आसपास टँकरचा आकडा जाईल, असा अंदाज सूत्रांनी वर्तविला. १ हजार १७६ गावांत, ३७६ वाड्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सध्या आहे.विभागात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याची टंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे. १२ लाख २ हजार ६८७ नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने पुरविले जात आहे. २०८६ विहिरी प्रशासनाने ताब्यात (अधिग्रहित) घेतल्या आहेत.बीड जिल्ह्यात ६ लाख ८९ हजार ३७६ नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ६२७ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. त्यानंतर जालना जिल्ह्यातील ४ लाख ६१ हजार ४९३ गावांना टँकरचे पाणी दिले जात आहे. ३३३ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. सध्या १४७० टँकर खाजगी कंत्राटदार संस्थांचे असून उर्वरित ६९ टँकर शासकीय आहेत. मोठ्या प्रमाणात टँकर लॉबीवर प्रशासनाला अवलंबून राहावे लागते आहे. परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत टँकरची संख्या कमी असली तरी आगामी काळात ती वाढण्याची शक्यता आहे.जिल्हा लोकसंख्या टँकरऔरंगाबाद १२ लाख ३ हजार ७५६जालना ४ लाख ६१ हजार २५२परभणी ७ हजार ४३८ ०३हिंगोली २० हजार ९०९ १३नांदेड ५३ हजार ९५९ २८बीड ६ हजार ८९ हजार ४४०लातूर १० हजार ४४० ०२उस्मानाबाद ९२ हजार ७९३ ४५एकूण २५ लाख १५३९मराठवाड्यातील प्रकल्पांची स्थितीप्रकल्प संख्या पाणीसाठामोठे ११ ६.५३ टक्केमध्यम ७५ ५.९५ टक्केलघु ७४९ ५.७४ टक्केबंधारे १३ १३.२० टक्केइ.बंधारे २४ ००.०० टक्केएकूण ८७२ ६.५० टक्के
मराठवाड्याच्या प्रकल्पात फक्त ६.५० टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 11:51 PM
मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा अतिशय भयावह जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील बहुतांश जलप्रकल्प तळाला गेले असून, काही प्रकल्प आटले आहेत. मोठ्या, मध्यम, लघुप्रकल्प बंधाऱ्यांत फक्त ६.५० टक्के इतका पाणीसाठा आहे. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न पावसाळ्यापर्यंत असणार आहे.
ठळक मुद्देटँकरचा आकडा दीड हजारांवर: २५ लाख लोकांना टँकरचे पाणी, बंधारे आटले