शहरात अधिकृत १५ बांधकामे तर अनाधिकृत ५० बांधकामे चालू आहेत. बांधकामाच्या एका साईटवर अंदाजे १० हजार लिटर पाणी दररोज वापरल्या जाते. एकीकडे शहरातील नागरीक तीव्र पाणी टंचाईला तोंड देत असतांना दुसरीकडे मात्र बांधकामासाठी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. परंतु नगर परिषदेने अद्याप ही बांधकामावर बंदी आणलेली नाही. परळी पालिका बड्या ठेकेदारांवर मेहरबान असल्याचेच चित्र शहरात पहावयास मिळत आहे.शहरातील गणेशपार, कृष्णा नगर, कृष्णा टॉकीज रोड, मोंढा, विद्यानगर, अरूणोदय मार्केट, पेठ मोहल्ला, बसवेश्वर कॉलनी, बरकतनगर या भागात दुष्काळी जन्य स्थितीत ही बांधकामे सर्रास चालू आहेत. येथे चालू असलेल्या बांधकामा पैकी मोजक्याच प्लॉट धारकांनी बांधकामाचा परवाना न. प.च्या बांधकाम विभागाकडून घेतलेला आहे. तर अनेक जण न. प. ची परवानगी न घेता ही बांधकामे करीत आहेत. न. प. कडून जे यईल त्याला बांधकाम परवाना दिले जातात.शहरात नगर परिषदेने नविन बांधकामे परवाने देवू नये अशी मागणी ओबीसी परिषदेचे तालुकाध्यक्ष विलास ताटे यांनी केली आहे. नविन बांधकामाला परवानगी न दिल्यास पाण्याचा होणारा अपव्यय टळेल असे मत ही ताटे यांनी व्यक्त केले. न.प. ला जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम परवाने देवू नये असा कुठलाही आदेश दिलेला नाही जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येताच या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. शहरात चालू असलेल्या बेकायदेशीर बांधकामाच्या संदर्भात ही चौकशी करून योग्य ते निर्णय घेतल्या जाईल असे न. प. चे बांधकाम सभापती जाबेरखान पठाण यांनी सांगितले.
परळीत पालिकेचाच आशीर्वाद..!
By admin | Published: March 30, 2016 12:20 AM