तालुक्यात कोरोनाने घट्ट विळखा घातल्याने पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर वेगाने फैलावली होती. यामुळे शहरासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. एप्रिलचा संपूर्ण महिना व मेच्या मध्यापर्यंत रुग्णवाढीचा वेग दुप्पट झाला होता. २३ एप्रिल रोजी तालुक्यात एकाच दिवशी सर्वाधिक २०१ रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली होती. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक होती. मेच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णवाढीचा वेग मंदावला होता. २९ मे रोजी केवळ ११ रुग्णांची वाढ झाली. गत दोन महिन्यातील हा सर्वात कमी आकडा होता. त्यांनतर १ जूनला तीन रुग्ण तर २ जून रोजी दोन रुग्ण आढळून आले. यामध्ये गळनिंब, कोळघर, गंगापूर, कटेपिंपळगाव व रांजणगाव शेपू येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
गंगापूर तालुक्यात दोन दिवसांत आढळले केवळ पाच रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:04 AM