- रऊफ शेखफुलंब्री : केंद्रीय कृषी मंत्रालयातील दोन सदस्यीय पथक बुधवारी सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चार गावातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दाखल झाले. रस्त्यावरील चार गावांतील पिकांची पाहणी करून ५० मिनिटांत दौरा आटोपून पथक सोयगाव तालुक्यातील पहाणीसाठी रवाना झाले.
राज्य सरकारने यंदा छत्रपती संभाजीनगर तालुका दुष्काळी म्हणून जाहीर केला आहे. या तालुक्यात दुष्काळाची काय स्थिती आहे याची पाहणी केंद्रीय कृषी मंत्रालयातील ए.एल. वाघमारे, हरीश उंबरजे या दोन अधिकाऱ्यांचे पथक करत आहे. पथकाने सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर -ते जळगाव महामार्गावर तुळजापूर येथील कपाशी पिकाची पाहणी केली त्य नंतर मोरहीरा ,खामखेडा ,डोनवाडा या गावातील रस्त्यालागत असलेल्या शेतातील कपाशी, मका,मुरघास या पिकांसह शेततळे ,पाझर तलावची पाहणी केली. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद देखील साधला.