शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
2
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
3
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
4
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
5
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
6
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
7
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
8
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
10
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
11
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
12
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
13
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
14
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
15
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
16
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
17
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
18
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
19
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
20
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."

विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस; बंडखोरांचे अर्जावर अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 2:03 PM

उमेदवारी अर्ज दाखल करण्यात इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असून, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढते आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात महायुतीमध्ये बंडखोरीचे संकेत मिळत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असून, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. २६ व २७ ऑक्टोबर सुटी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २८ व २९ ऑक्टोबर हे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. पैठण, फुलंब्री, कन्नडमध्ये बंडखोरांचे अर्ज दाखल करण्याचे सत्र सुरू आहे. उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी ३७ जणांनी ६६ अर्ज खरेदी केले, तर २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. दरम्यान, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितले, २६ व २७ रोजी उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया बंद असेल.

२८ जणांचे अर्ज दाखल : चौथ्या दिवशी नेले ६६ अर्जविधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करून घेण्याची प्रक्रिया जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत सुरू झाली. पहिल्याच दिवशी २६८ जणांनी ५८७ अर्ज घेतले होते. दुसऱ्या दिवशी, बुधवारी १७५ जणांनी ३८५ उमेदवारी अर्ज खरेदी केले. गुरुवार २४ रोजी १४९ अर्ज नेले, तर २४ जणांनी दाखल केले. शुक्रवारी ३७ जणांनी ६६ अर्ज खरेदी केले, तर २८ उमेदवारी अर्ज दाखल केले.

चौथ्या दिवशी आलेले अर्ज...सिल्लोड : संगपाल सोनवणे (बसपा), श्रीराम आळणे (अपक्ष)कन्नड : मनोज पवार (अपक्ष), अ. जावेद अ. वाहेद (अपक्ष), सईद अहेमद खाँ (अपक्ष)फुलंब्री : मंगेश साबळे (अपक्ष), रमेश पवार (अपक्ष), रमेश काटकर (अपक्ष)औरंगाबाद मध्य : बबनगीर गोसावी (हि.ज.पा.)औरंगाबाद पश्चिम : संजय शिरसाट (शिंदेसेना), मनीषा खरात (अपक्ष)औरंगाबाद पूर्व : अतुल सावे (भाजपा), शेख गफरान (अपक्ष), जयप्रकाश घोरपडे (भा.शे.का.प), साहेबखान पठाण (बीआरएसपी), मो.इसा.मो.यासीन (एमआयएमएआयएएम)पैठण : अनिल राऊत (अपक्ष), गाेरखनाथ राठोड (अपक्ष), अजारोद्दी कादरी (आ.स्वा.से), वामन साठे (बसपा), जियाउल्ताह अकबर शेख (अपक्ष), विजय चव्हाण (अपक्ष).

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमpaithan-acपैठणvaijapur-acवैजापूरgangapur-acगंगापूरkannad-acकन्नडsillod-acसिल्लोडphulambri-acफुलंब्री