दुभाजकाची दुरवस्था
औरंगाबाद : आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक रस्त्यावरील दुभाजकाची दुरवस्था झाली आहे. दुभाजकात जागोजागी कचरा पडून आहे. शिवाय दुभाजकाच्या लोखंडी जाळ्याही गायब झाल्या आहेत. याकडे मनपाने लक्ष देऊन दुभाजकाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी होत आहे.
पाणचक्की रस्त्यावर मातीचे ढीग पडून
औरंगाबाद : पाणीचक्की गेटजवळील रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून मातीचे ढीग पडून आहेत. हे ढीग हटविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा येत आहे. त्यामुळे मातीचे ढीग तात्काळ हटविण्याची मागणी होत आहे.
वाहनांच्या रांगेतच कचऱ्याचे ढीग पडून
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये कचऱ्याचे ढीग अद्यापही कायम आहेत. वाहनांच्या रांगेत कचरा पडून आहे. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ये-जा करताना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन कचरा हटविण्याची मागणी होत आहे.
सन्मित्र कालनीत स्वच्छतेकडे दुर्लक्ष
औरंगाबाद : सन्मित्र कालनीत रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग साचले आहेत. याठिकाणी कायम कचरा पडून राहत आहे. मनपाकडून निमयितपणे कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.