शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

दिवसरात्र रस्त्यावरच भरतात ‘ओपन बार’; वाईन शॉपच्या परिसरात नागरिकांना तळीरामांचा त्रास

By राम शिनगारे | Updated: December 11, 2024 19:58 IST

सायंकाळी उघडणाऱ्या वडापाव, चायनीज सेंटर्सवरही अनेकांना सहजपणे दारू मिळते. तेथेच तळीराम दारू ढोसत असल्याचे दिसून आले.

छत्रपती संभाजीनगर : वाईन शॉप, देशी दारूच्या दुकानांच्या बाहेर सकाळपासून संध्याकाळी दुकान बंद होईपर्यंत तळीरामांचे दारू पिण्यासाठी ‘ओपन बार’ रोज भरत आहेत. या प्रकाराचा त्रास येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना होत असतो. त्याशिवाय उस्मानपुऱ्यासह दारूची काही दुकाने शाळांच्या परिसरात आहेत. त्यामुळे त्याचा त्रासही विद्यार्थ्यांना होत आहे. उस्मानपुरा परिसरातील क्लासेस असलेल्या ठिकाणीच तळीराम सकाळपासून रस्त्यावर दारू पित बसलेले असतात. तो एक रस्ता तळीरामांनी ताब्यात घेतल्याचे दिसले. त्याशिवाय सायंकाळी उघडणाऱ्या वडापाव, चायनीज सेंटर्सवरही अनेकांना सहजपणे दारू मिळते. तेथेच तळीराम दारू ढोसत असल्याचे दिसून आले.

साहेब या भागावर आपले लक्ष आहे का ?मोंढा नाका उड्डाणपुलाच्या खाली : मोंढा नाका उड्डाणपुलाच्या परिसरातच एक वाईन शॉप आहे. त्याठिकाणी दारू विकत घेऊन तळीराम थेट समोरील उड्डाणपुलाच्या खाली बसूनच दारू पितात. सकाळी ७ वाजेपासूनच गर्दी दिसते. रात्रीपर्यंत तळीरामांचा वावर सुरू असतो.उस्मानपुऱ्यातील क्लासेसच्या बाजूला : उस्मानपुऱ्यातील देशपांडे चौकाच्या परिसरातच एक वाईन शॉप आहे. त्याच्या अगदी जवळूनच एक रस्ता जातो. त्या रस्त्याच्या बाजूच्या इमारतीमध्ये अनेक क्लासेस आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनींची ये-जा सुरू असते; मात्र त्या वर्दळीच्या रस्त्यावरच तळीराम दारू ढोसतात.

पुंडलिकनगरचा मुख्य रस्ता : पुंडलिकनगरच्या मुख्य रस्त्यावरील अनेक हातगाड्या लागतात. त्यातील काही गाड्यांवर दारू विकतात. तळीरामांना कोणत्या हातगाडीवर काय मिळते, याची माहिती असते. त्या ठिकाणी रस्त्यावरच दारू पितात. हा प्रकार शक्यतो सायंकाळी घडतो. त्याशिवाय सिडको उड्डाणपुलाच्या बाजूच्या सर्व्हिस रोड, रामगिरी हॉटेलच्या इमारतीच्या खालील भागातही सायंकाळी तळीराम उघड्यावरच दारू पिताना दिसले.

रस्त्यावर दारू ढोसताय; कारवाया किती ?शहर पोलिस काहीवेळा अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करतात; मात्र रस्त्यावरच दारू पिणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. हे तळीराम बिनदिक्कतपणे दारू ढोसतात. त्यांच्यावर कोणाचेही बंधन नसल्याचेच दिसून येते. त्यामुळे रस्त्यावर दारू ढोसणाऱ्या तळीरामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

‘ओपन बार’वर कारवाई का होत नाही ?रस्त्यावरच चालविण्यात येणाऱ्या ओपन बारवर कारवाई पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत नाही. अवैध दारू विक्रेत्यांवर किरकोळ कारवाया होतात. त्यामुळे वाईन शॉपच्या परिसरातील रस्त्यावर तळीरामांचा संचार अधिक वाढत असल्याचे दिसते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरalcohol prohibition actदारुबंदी कायदाCrime Newsगुन्हेगारी