लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात महावितरणचे रोहित्र तसेच फ्यूज बॉक्स सताड उघडे असल्याने मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याकडे महावितरणचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. शहर परिसरात शंभरपेक्षा अधिक रोहित्र व शेकडो फ्यूज बॉक्स आहेत. सदर रोहित्रास तार कुंपन तसेच फ्यूज बॉक्सला झाकण नसल्याने अनेकदा स्पार्किंग होऊन आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या प्रकाराकडे महवितरणचे दुर्लक्ष आहे. शहरातील लक्कड कोट, नूतन वसाहत, चंदनझिरा, लालबाग, इंदिरानगर, संभाजीनगर, रेल्वेस्थानक परिसर आदी भागात रोहित्रांची स्थिती बिकट आहे. काही रोहित्रांमधून आॅईल गळती होते. यामुळे मोठी आग लागण्याची भीती आहे. बहुतांश रोहित्र व फ्यूज बॉक्स मुख्य रस्त्यांवरच असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महावितरणकडून किरकोळ दुरूस्ती केली की अवस्था जैसे थेच होते. याचा त्रास परिसरातील नागरिकांना करावा लागत आहे. काही रोहित्रांमधून आॅईल गळतीही होते. धोका फ्यूज बॉक्समुळे जनावरे तसेच लहान मुलांना धोका होण्याची भीती आहे. जनावरे रोहित्र परिसरात फिरतात तर काही मुलेही अजाणतेपणी येथे फिरतात. महावितरण कंपनीने धोकादायक रोहित्र व फ्यूज बॉक्सची तात्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
रहदारीच्या रस्त्यावरील उघडे रोहित्र जीवघेणे
By admin | Published: May 16, 2017 12:41 AM