शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

खुलेआम ओव्हरलोड वाहतूक...

By admin | Published: March 29, 2017 12:20 AM

जालना : शहर परिसरातून चार वळण रस्त्यांवर क्षमतपेक्षा अधिक वजन वाहतूक करण्याची स्पर्धाच लागली आहे.

जालना : शहर परिसरातून चार वळण रस्त्यांवर क्षमतपेक्षा अधिक वजन वाहतूक करण्याची स्पर्धाच लागली आहे. ओव्हरलोड वाहतूक करून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविला जात आहे. आरटओंच्या पथकालाही हुलकावणी देत ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांची दहशत वाढली असल्याचे लोकमतने सोमवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघड झाले. अनेक वाहनांची वजन वाहून नेण्याची क्षमता नसतानाही क्षमतेपेक्षा दोन ते तीन पट वजन वाहून नेण्याची स्पर्धाच सुरू आहे. महाराष्ट्रासोबतच परराज्यांतील शेकडो वाहनांतून सर्रास वाहतूक सुरू आहे. जालना शहरातील देऊळगावराजा चौफुली, मंठा चौफुली, औरंगाबाद चौफुली दररोज शेकडो वाहने दिसून येतात. नागपूर, हैदराबाद, सोलापूर आदी महानगरांकडे जालन्यातील वळण रस्त्यांवरून वाहतूक होते. दिवसाकाठी दीड हजारपेक्षा अधिक तर रात्री अडीच ते तीन हजार ट्रक, टेंपो आदी वाहनांतून मालवाहतूक करण्यात येते. यात प्रामुख्याने धान्य, सिमेंट तसेच अन्य साहित्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे प्रत्येक ट्रक ताडपत्रीने बांधलेला असल्यामुळे वजन करण्याचे कष्ट आरटीओ अथवा पोलीस टाळतात. याचा फायदा ट्रक चालक घेत आहेत. वाळू वाहतुकीतून सर्वात जास्त वजनांचे नियम मोडीत काढले जात आहेत. टिप्पर अथवा ट्रॅक्टरमधून वाळू वाहतुकीने सर्वांनाच जेरीस आणले आहे. वाळू वाहतूकदार क्रमांक न लिहिताच अथवा तो पुसट करून वाहतूक करीत आहेत. यामुळे तहसील अथवा पोलिसांना कारवाई करताना अडचण येत आहे. अतिक्ति भार आणि भरधावामुळे वाळू टिप्परमधून अपघातांची संख्या गत काही महिन्यांत वाढल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. वळण रस्त्यांवर महामार्ग पोलीस असले तरी त्यांचे काम क्रमांक नसणे, कागदपत्र तपासणे आदी कामे येतात. ओव्हरलोड तपासण्याचा अधिकार त्यांना नसल्याचे आरटीओंनी सांगितले. (प्रतिनिधी)