लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील बासंबा येथून राष्टÑीय राज्यमार्ग क्र. १६१ जात असून या बाबत कोणतीच अधिसूचना किंवा माहिती न देताच बासंबा शेतकºयांना अंधारात ठेवून भूसंपादन करण्यात आल्याने शेतकºयांनी निवेदनाद्वारे विरोध दर्शविला आहे.गेल्या दोन-तीन वर्षांपासून दुष्काळ, निसर्गाच्या अवकृपेमुळे हैराण झालेला शेतकरी आता कर्जमाफीच्या रांगांत लागून रडत आहे. आॅनलाईनवरील प्रतीक्षा, सातबारासाठी हेलपाटे घेऊन उसंत घेत नाही तोच राष्ट्रीय महामार्गात काहींचे सर्वस्वच जात आहे. अनेक शेतकºयांची बागायती जमीन यात जात असल्याने या मार्गाला शेतकºयांनी विरोध केला. विशेष म्हणजे काहींना यानंतर शेतच उरत नसल्याने त्याची वेगळीच चिंता लागली. तर शेतकºयांना न विचारता मोजमाप केले. त्यामुळे प्रसंगी मरण पत्करायची तयारी असून यासाठी आम्ही जमिनी देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. निवेदनावर बबनराव जामुंदे, प्रमोद ढाले, गजानन ढाले, शंकर ढाले, रामराव सीताराम जामुंदे, विजय घुगे, पांडुरंग थोरात, नारायण जाधव, संजय घुगे, शंकर घुगे, राधाबाई कुरवाडे, दत्तराव घुगे, दीपक शिंदे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
राष्ट्रीय महामार्गाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:01 AM