पैठण (औरंगाबाद ) : आम्ही राबविलेली कोणतीही योजना अमूक एका जाती समूहासाठी नसून, ती सर्वांसाठी आहे. नेमकी हीच बाब विरोधकांच्या पचनी पडत नाही. त्यामुळेच विरोधक दलित-मुस्लीम समाजात भाजपबद्दल संभ्रम निर्माण करून विष कालवण्याचे काम करत आहेत. मतदारांनी विरोधकांचा डाव हाणून पाडावा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते पैठण येथे रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
यावेळी गडकरी म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू ते राहुल गांधी यांच्यापर्यंत सर्वांनी गरिबी हटावचा नारा दिला, पण काँग्रेसच्या काळात सर्वसामान्य माणसांची नव्हे तर कॉंग्रेसचे नेते -कार्यकर्ते यांचीच गरिबी हटली. आज ही नेहरूंचे पणतू गरीबी हटाव ची घोषणा देऊन मतदान मागत आहेत, देशात ६५ वर्षे सत्ता उपभोगुनही त्यांना गरीबी हटवता आली नाही ही मोठी शोकांतिका आहे अशी टीकाही गडकरी यांनी यावेळी केली.
खरेदी विक्री संघाच्या मैदानावर झालेल्या या सभेत रावसाहेब दानवे, आमदार भुमरे, नगराध्यक्ष सुरज लोळगे, भाऊसाहेब देशमुख, भागवत कराड, एकनाथ जाधव, तुषार शिसोदे, दत्ता गोर्डे, डॉ सुनिल शिंदे, शेखर पाटील, सोमनाथ परदेशी, कांतराव औटे, कांचनकुमार चाटे, विजय चाटुपळे, लक्ष्मण औटे, सुरेश दुबाले, प्रल्हाद औटे, बद्रीनारायण भुमरे, आशिष मापारी, सतिश आहेर, रेखाताई कुलकर्णी, सुलोचना साळुंके, साधना आदमाने, अश्विनी लखमले, नम्रता पटेल आदींची उपस्थिती होती.