'संभाजीनगर' नामांतराला विरोध; औरंगाबादेत कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 03:12 PM2022-06-30T15:12:51+5:302022-06-30T15:14:31+5:30
आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत याचे पडसाद उमटणार आहेत.
औरंगाबाद: महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले. यास विरोध करत कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे. औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी, मराठवाडा अल्प संख्यांक विभागाचे अध्यक्ष हमद चाऊस यांच्यासह अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे आहेत.
शिवसेनेतील बंडाळीनंतर महाविकास आघाडी सरकारसमोरने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक घेत निर्णयांचा धडाका लावला. औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशीव’ अशा नामांतरास मान्यता देण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाकडून आलेल्या नामांतराच्या प्रस्तावांना मान्यता दिल्यानंतर आता ते केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहेत. मात्र, या नामकरणास स्थानिक कॉंग्रेसमधून विरोध होऊ लागला आहे. औरंगाबादमधील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाविरोधात राजीनामा सत्र सुरु केले आहे. आजवर कॉंग्रेसचा संभाजीनगर नामांतर करण्यास विरोध होता. परंतु, महाविकास आघाडीच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत आलेल्या संभाजीनगर नामांतर प्रस्तावास कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी विरोध दर्शवला नाही. नामांतराचा निर्णय होताच स्थानिक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी यास विरोधात दर्शवत आपले राजीनामे सादर केले आहेत. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत याचे पडसाद उमटणार आहेत. यामुळे कॉंग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
या पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा
- मोहम्मद हिशाम उस्मानी, अध्यक्ष-औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस
- हमद चाऊस, मराठवाड़ा अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग
- मझर पटेल, जिल्हा अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग
- शेख अथर, शहर जिल्हा अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग
- सय्यद हमीद, शाहगंज ब्लॉक अध्यक्ष
- आमेर अब्दुल सलीम, प्रदेश महासचिव युवक कॉंग्रेस
- इद्रीस नवाब खान, प्रदेश सचिव युवक कॉंग्रेस
- मुजफ्फरखान पठाण, सचिव ,औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस
- अखिल पटेल, मा.प्रदेश महासचिव युवक कॉंग्रेस व सदस्य औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस
- मसरूर सोहेल खान, मा.प्रदेश सचिव युवक कॉंग्रेस व सदस्य औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस
- मोईन ईनामदार, मा.प्रदेश सचिव युवक कॉंग्रेस व सदस्य औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस
- हाजी मोईन क़ुरैशी, शहर जिल्हा कार्याध्यक्ष, अल्पसख्यांक विभाग
- इरफ़ान गुलाब खान, शहर जिल्हा उपाध्यक्ष युवक कॉंग्रेस
- लियाक़त पठाण, मा.अध्यक्ष औरंगाबाद पूर्व विधान युवक कॉंग्रेस व सदस्य ,औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस
- शेख शफीक सरकार, महासचिव, शहर जिल्हा युवक कॉंग्रेस
- शोएब अब्दुल्ला शेख, महासचिव, शहर जिल्हा युवक कॉंग्रेस
- इंजीनियर मोहसीन खान, महासचिव, शहर जिल्हा युवक कॉंग्रेस
- अनीस पटेल, प्रदेश महासचिव, किसान खेत मज़दूर कॉंग्रेस
- शेख सगीर अहेमद, विधान सभा सचिव,युवक कॉंग्रेस
- शेख फैज़, विधान सभा अध्यक्ष ,युवा कॉंग्रेस