लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचरा टाकण्यास विरोध करणाºया ४० ते ५० जणांविरोधात रविवारी गुन्हा नोंदविल्यानंतर सोमवारी सायंकाळी पुन्हा कच-यास विरोध करण्यासाठी जमलेल्या १०० नागरिकांना छावणी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पडेगाव परिसरात सोमवारी सायंकाळी करण्यात आली.पडेगाव येथील गट नंबर ६६ आणि ६७ मध्ये कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाने जागा आरक्षित केली. महानगरपालिकेतर्फे तेथे कचरा टाकला जात आहे. भावसिंगपुरा येथील नागरिकांनी तेथे कचरा टाकण्यास विरोध केला. कचरा घेऊन जाणाºया सात -आठ गाड्या परिसरातील कार्यकर्त्यांनी अडविल्या होत्या.त्याप्रकरणी वॉर्ड अधिकारी भालचंद्र पैठणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलिसांनी गणेश लोखंडे, राहुल वर्मा, रवींद्र राठोड, सुनील लोखंडे, किशोर सातपुते यांच्यासह ४० ते ५० जणांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे आणि रस्ता अडविणे आदी कलमांखाली गुन्हा नोंदविला. या गुन्ह्यानंतरही कार्यकर्त्यांनी त्यांचे आंदोलन सोमवारी सुरूच ठेवले. शंभरहून अधिक कार्यकर्ते सोमवारी कचरा प्रक्रिया केंद्राला विरोध करण्यासाठी पडेगाव येथे जमले होते. आंदोलनाला वेगळे वळण लागण्यापूर्वीच पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना एमआयडीसी वाळूज ठाण्यात नेले. रात्री उशिरापर्यंत सर्व आंदोलक पोलिसांच्या ताब्यात होते.१५ आॅगस्टला शहर बस सुरू करणारस्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिका बस खरेदी करणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. १५ आॅगस्टला या योजनेचा शुभारंभ करण्याचा मानस असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. यापूर्वी निविदा प्रसिद्ध केली असता एका मोठ्या कंपनीने निविदा भरली होती. त्यामुळे मनपाला निविदा पुन्हा नव्याने प्रसिद्ध करावी लागली होती.
कचऱ्याला विरोध; १०० जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:40 AM