लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जुना मोंढ्यातील नवीन पुलाजवळ असलेल्या आर्य समाज मंदिराच्या इमारतीत भाडेतत्त्वावर असलेल्या आर्य हिंदी विद्यामंदिर या सरकारी अनुदानित प्राथमिक मराठी शाळेची इमारत मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यामुळे जि़ प़ शिक्षण विभागाने २८ सप्टेंबर रोजी शाळा स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत़आर्यन शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर्य हिंदी विद्यामंदिर ही प्राथमिक शाळा मोडकळीस आलेल्या इमारतीत भरते़ यासंर्दभात जि़ प़ शिक्षण विभागाने शाळेचा स्थलांतराचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे अनेकदा सुचित केले होते़ महापालिकेने शाळा इमारतीची तपासणी केली असून ही इमारत धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे़ शाळेची इमारत वास्तव्यास योग्य नाही़ ती कोसळण्याच्या अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका असल्याची नोटीस इमारतीचे मालक असलेल्या आर्य समाज मंदिरास दिली़आर्य समाज आणि त्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा याचे पदाधिकारी डॉ़ तुंगार, सत्येंद्र बळीराम आर्य, चिंचोलीकर, मारमपल्ले, कुलकर्णी, डॉ़ ब्रह्ममुनी, उग्रसेन राठौर आदींनी शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळेचे स्थलांतर करण्यासंदर्भात सूचना दिल्या़ पण मुख्याध्यापकांनी कोणताही निर्णय घेतला नाही़ त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जि़ प़ अधिकाºयांना निवेदन दिले़दरम्यान, शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकास दिलेल्या नोटीसद्वारे शाळा स्थलांतराचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर करावा़प्रस्ताव सादर न केल्यास शाळेची मान्यता काढण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल, असे कळविले आहे़
आर्य विद्यामंदिराच्या स्थलांतराचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 12:38 AM