सरपंचपदाची निवडणूक रद्द करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 09:03 PM2018-12-24T21:03:51+5:302018-12-24T21:04:08+5:30
औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील श्रीकृष्णनगरच्या सरपंचपदाची २४ डिसेंबर रोजी होणारी निवडणूक रद्द करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे ...
औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील श्रीकृष्णनगरच्या सरपंचपदाची २४ डिसेंबर रोजी होणारी निवडणूक रद्द करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. जी. अवचट यांनी मंजूर केली. यावर पुढील सुनावणी ७ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे.
ग्रामसभा न घेतल्याने जालना जिल्ह्यातील श्रीकृष्णनगरच्या सरपंच आशा शिवाजी वाढेकर यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले होते. त्याविरुद्ध त्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १६ अन्वये अपील दाखल केले होते. ग्रामसभा नियमानुसार घेतल्या. शासनाच्या आदेशानुसार या ग्रामसभा घेण्यात आल्या. ग्रामसेवकाकडे याविषयीचे अभिलेखही उपलब्ध असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. प्रतिवादींनी दिशाभूल करणारी माहिती सादर केली. त्याआधारे जिल्हाधिकाºयांनी अपात्रतेचा निर्णय घेतल्याचे म्हणणे मांडण्यात आले. सुनावणीअंती अपर विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. जिल्हाधिकाºयांनी सरपंचपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तसेच त्याआधारे सोमवारी (दि.२४ डिसेंबर) सरपंचपदाची निवडणूक होणार होती. त्या नाराजीने वाढेकर यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. अॅड. विष्णू बी. मदन-पाटील यांनी वाढेकर यांच्या वतीने युिक्तवाद केला. सुनावणीअंती निवडणूक रद्द करण्याची विनंती खंडपीठाने मंजूर केली.