परभणी : येथील कृषी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांविरुद्ध ९ मार्च रोजी विद्यापीठ प्रशासनाकडे रॅगिंगची तक्रार आली होती. यासंदर्भात चौकशी करुन दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश कुलगुरुंनी दिल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. विद्यार्थी उमेश चादर व माजी विद्यार्थी मनोज बागल यांच्याविरुद्ध नवा मोंढा ठाण्यात रॅगिंगप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश कुलगुरु डॉ. व्यंकटेश्वरु यांनी दिले असून, चौकशी सुरु असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे. (प्रतिनिधी)
रॅगिंगप्रकरणी कारवाईचे आदेश
By admin | Published: March 14, 2016 12:35 AM