तातडीने ‘डीसीएचसी’ सुविधा सुरू करावी
औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गात ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच ठिकाणी उपचार सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पैठण येथील घाटी अंतर्गत असलेल्या आरोग्य प्रशिक्षण केंद्रात तातडीने कोरोना ‘डीसीएचसी’ उपचार सुविधा सुरू करण्याची सूचना रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी सोमवारी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात भूमरे यांनी बैठकीत सूचना केल्या.
मनपाने सुरू केले लसीकरण केंद्र
औरंगाबाद : मनपाने शिवशंकर कॉलनी, बौद्धनगर, बालाजीनगर परिसरातील नागरिकांसाठी वात्सल्य हॉस्पिटल येथे कोव्हॅसिन लसीकरण केंद्र सुरू केले आहे. माजी महापौर त्र्यंबक तुपे, डॉ. चव्हाण यांनी केंद्र सुरू करण्यासाठी परिश्रम घेतले. गोरख सोनवणे, संजय पवार, संतोश पडोळ, विकी साळवे, नागेश शिंदे, पंकज गुडदे, सचिन जाधव, डॉ. जमील पटेल, प्रगती गायकवाड, सरला देशमुख, सुनीता राठोड, आदी नागरिकांना सहकार्य करीत आहेत.