लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेतील सहायक नगररचना अधिकारी डी.पी. कुलकर्णी यांना मागील वर्षी टी.डी.आर. घोटाळ्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. त्यांना आज विभागीय चौकशीच्या अधीन राहून परत सेवेत घेण्याचा निर्णय आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी घेतला. कुलकर्णी यांना कार्यकारी अभियंता विद्युत आणि ड्रेनेज म्हणून नियुक्ती देण्यात आली. त्याचप्रमाणे लेखाधिकारी संजय पवार यांनाही पेस्ट कंट्रोलच्या बोगस फायलींप्रकरणी तत्कालीन आयुक्तांनी निलंबित केले होते. पवार यांना परत मनपा सेवेत घेण्यात आले, पण त्यांची पदस्थापना वॉर्ड अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.मागील अनेक वर्षांपासून नगररचना विभागात सहायक संचालक नगररचना म्हणून काम पाहणारे अधिकारी डी. पी. कुलकर्णी यांना तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी टी.डी.आर. घोटाळ्यात दोषी धरून १८ एप्रिल २०१६ रोजी निलंबित केले होते. या निलंबनाने महापालिकेत एकच खळबळ उडाली होती. त्यांच्यासोबत आणखी दोन कर्मचाºयांनाही निलंबित करण्यात आले होते. त्यातील आर.पी. वाघमारे यांना अलीकडेच सेवेत परत घेण्यात आले. उपअभियंता शिरीष रामटेके निवृत्त झाले आहेत. निलंबित अधिकारी परत मनपा सेवेत येऊच नयेत या दृष्टीने तत्कालीन आयुक्तांनी फिल्डिंग लावली होती. फेब्रुवारी २०१७ मध्ये आयुक्तांचीच शासनाने बदली केली, त्यामुळे निलंबित अधिकाºयांचा मार्ग मोकळा झाला होता. विद्यमान आयुक्त मुगळीकर यांनी शासनाला पत्र लिहून खास शासनाकडून सहायक संचालक नगररचना अधिकारी बोलावून घेतले. दोन महिन्यांपूर्वीच नांदेड येथील अधिकारी आलुरकर रुजू झाले. आता त्यांच्या जागेवर परत डी.पी. कुलकर्णी यांना कसे घ्यावे, असा प्रश्न प्रशासनाला पडला होता. अखेर यामध्ये मध्यम मार्ग निवडण्यात आला. (पान २ वर)
कुलकर्णी, पवार यांना रूजू करून घेण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 1:03 AM