औरंगाबाद : औरंगाबादेतील प्रतिभावान खेळाडूंना जिल्हा संघटनेतर्फे स्पर्धेचे आयोजन होत नसल्यामुळे त्यांना औद्योगिक स्पर्धेत खेळावे लागते. तेथे त्यांचा कस पणाला लागत नाही. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेने एडीसीए मैदानावर होणारे टेनिस बॉलवरील क्रिकेट स्पर्धा बंद कराव्यात आणि क्लब क्रिकेट आणि साखळी क्रिकेट स्पर्धा सुरू कराव्यात, अशी मागणी खेळाडू संघटनेने आज औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर झालेल्या बैठकीत केली आहे.सध्या जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर टेनिस बॉलच्या क्रिकेट स्पर्धाच जास्त होत आहेत. औरंगाबादेतील प्रतिभावान खेळाडूंसाठी जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे स्पर्धांचे आयोजन होत नाही. त्यामुळे त्यांना औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास भाग पडते. तेथे या स्पर्धेचा अनुभवाच्या दृष्टीने विशेष फायदा खेळाडूंना होत नाही. त्यांचा कस तेथे लागत नाही. त्यामुळे जिल्हा क्रिकेट संघटनेने १४, १६ व १९ वर्षांखालील तसेच सिनिअर गटासाठीदेखील स्पर्धेचे आयोजन करून त्यांना जास्तीत जास्त सामने खेळण्याची संधी मिळायला हवी. त्याचप्रमाणे स्पर्धेआधी त्यांचा दोन महिने कसून सराव घेतला जावा; परंतु ऐनवेळी संघ निवडला जातो. खेळाडूंना अनुभव मिळावा यासाठी वनडे स्पर्धेची क्लब क्रिकेट स्पर्धा आणि दोनदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यास जिल्हा क्रिकेट संघटनेने पुढाकार घ्यायला हवा, असे खेळाडू संघटनेचे म्हणणे आहे. विकास नगरकर याच्यावरील बंदी हटल्यानंतरही शहीद भगतसिंह क्रिकेट स्पर्धेत खेळू न दिले जाणे हा स्पर्धा आयोजकांकडून खेळाडूंचाच नव्हे, तर जिल्हा क्रिकेट संघटनेचा अपमान असल्याची भावनाही यावेळी खेळाडू संघटनेने व्यक्त केली. सध्या पंचदेखील स्पर्धा आयोजित करतात. त्यामुळे पंचांनी अशा वेळेस फक्त आयोजकांचीच भूमिका पार पाडायला हवी, त्यांनी पंचांची जबाबदारी पार पाडू नये. पंचांनीही काही वाद असेल तर मैदानातच सोडवायला हवेत, असेही खेळाडू संघटनेचे म्हणणे आहे. बैठकीत औरंगाबादचे ज्येष्ठ खेळाडू आणि प्रशिक्षक शेख हबीब यांनी खेळाडूंच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ज्येष्ठ खेळाडू दिनेश कुंटे, प्रशिक्षक विनोद माने, कर्मवीर लव्हेरा, शेख रफिक, पंकज फलके, मिलिंद पाटील, विजय अडलाकोंडा, बॉबी खेत्रे, विवेक येवले, प्रदीप जगदाळे, विकास नगरकर, वसीम खान, संदीप जाधव, प्रीतेश चार्ल्स, अजय काळे, प्रदीप जाधव, विशाल नरवडे, पंच अॅड. बाळासाहेब वाघमारे, विद्याधर पांडे, सिद्धार्थ भरणे, बळवंत चव्हाण आणि विनोद जाधव यांची उपस्थिती होती.
संघटनेने क्लब क्रिकेट, साखळी स्पर्धा सुरू करण्यास पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:49 AM
औरंगाबादेतील प्रतिभावान खेळाडूंना जिल्हा संघटनेतर्फे स्पर्धेचे आयोजन होत नसल्यामुळे त्यांना औद्योगिक स्पर्धेत खेळावे लागते. तेथे त्यांचा कस पणाला लागत नाही. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेने एडीसीए मैदानावर होणारे टेनिस बॉलवरील क्रिकेट स्पर्धा बंद कराव्यात आणि क्लब क्रिकेट आणि साखळी क्रिकेट स्पर्धा सुरू कराव्यात, अशी मागणी खेळाडू संघटनेने आज औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर झालेल्या बैठकीत केली आहे.
ठळक मुद्देखेळाडू संघटनेची मागणी : एडीसीए मैदानावरील टेनिसबॉलवरील स्पर्धा बंद करा