शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
2
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
3
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
4
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
5
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
7
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
8
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
9
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
10
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
11
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
12
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
13
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
14
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
15
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
16
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
17
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
18
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
20
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

औरंगाबादेत दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे आयोजन; कविता, चर्चासत्र, रॅपची पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 3:19 PM

जेष्ठ साहित्यिक ज.वि पवार, दिलीप मंडल (दिल्ली), सूरज येंगडे (अमेरिका) यांची विशेष भाषणे यावेळी होणार आहेत.

औरंगाबाद :  दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड, नागपूर नंतर आता औरंगाबाद येथे दोन दिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात दि. १७ आणि १८ डिसेंबर रोजी महोत्सव पार पडेल. महोत्सवात परिसंवाद, चर्चासत्र, काव्यवाचन, मुलाखती, रॅप आदि कार्यक्रमांची रेलचेल असेल. 

सध्याच्या बदलेल्या सामाजिक पार्श्वभूमीवर दलित पँथरची चळवळ आणि प्राप्त परिस्थिती याचे सखोल विवेचन या महोत्सवात होणार आहे. महोत्सवात कवीसंमेलन, चर्चासत्र, मुलाखत, नाटक, गीते, रॅप आदींच्या माध्यमातून आंबेडकरी विचारांचा जागर होणार आहे. शनिवार दि.१७ व रविवार दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दलित पँथरच्या इतिहासाला उजाळा देऊन नव्या पिढीला अंतर्मुख करणाऱ्या या महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सतीश पट्टेकर, सचिन निकम, सिद्धार्थ शिनगारे, गुणरत्न सोनवणे, दिपक डांगरे, राहुल वडमारे आदींनी केले आहे.

पँथर चळवळीतील मान्यवरांचा सन्मानमहोत्सवात जेष्ठ पँथर नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. तसेच दोन्ही दिवस दलित पँथरच्या चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्यांचा व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

अशी असेल रूपरेषा : पहिला दिवसदि.१७ रोजी सकाळी १०:३० वाजता सागर चक्रनारायण व भाग्यश्री अभ्यंकर ह्यांच्या भीमगित गायनाने ह्या महोत्सवाचे उदघाटन होईल. परिसंवाद: दुसरे सत्र; उदघाटन सत्रानंतर रतनकुमार पंडागळे, रमेशभाई खंडागळे, श्रावण गायकवाड, राजेंद्र गोणारकर, अतिष बनसोडे(सोलापूर), डॉ.उत्तम अंभोरे यांचा पँथर चळवळ या विषयावर परिसंवाद होईल.नाटक: तिसरे सत्र; दु. १ ते ३ या वेळेत 'गटार' हे वीरेंद्र गणवीर ( नागपूर) लिखित, दिग्दर्शित नाटकाचे सादरीकरण होईल.परिसंवाद: चवथे सत्र- दुपारी ३:३० ते ५ या वेळेत; 'भारतीय संविधान' या विषयावर पवनकुमार शिंदे, महेश भोसले, बोधी रामटेके (नागपूर) आणि राहुल सावळे यांचा सहभागकाव्य संगिनी: पाचवे सत्र- दु.०५.१५ ते सायं.६; कवी देवानंद पवार, सचिन डांगळे (मुबंई), सुमित गुणवंत(पुणे), आदिती गांजापूरकर(नांदेड) यांचा सहभाग चर्चासत्र: सहावे सत्र- सायं. ०६.१५ ते सायं. ०७.४५; 'स्त्री चळवळ' या विषयावर रुख्मीनीबाई सातपुते, माया बनसोडे(मुंबई), वनश्री वनकर(वर्धा), सोनाली मस्के, सुनिता सावरकर, योगिनी पगारे(मुंबई) यांचा सहभाग परिसंवाद: सातवे सत्र- सायं. ८ ते ९ वा.; शैलेश नरवाडे(नागपूर), सोमनाथ वाघमारे(मुंबई), निलेश आंबेडकर(नाशिक), अशोक बंडगर (औरंगाबाद) यांचा सहभाग भीमगीते: आठवे सत्र- रात्री ९.१५ ते १०.३० वा; संजय मोहाड, स्नेहल प्रधान व प्रबोधून ग्रुप यांचे सादरीकरण

दुसरा दिवस : रविवार, १८ डिसेंबर २०२२परिसंवाद: पहिले सत्र- स. १०.१५ ते १२.४५; जेष्ठ साहित्यिक तथा दलित पँथरचे संस्थापक सदस्य ज. वि. पवार, दिलीप मंडल (दिल्ली), सुरज एंगडे (अमेरिका), प्रविण मोरे (पुणे) हे आपले विचार मांडतील.काव्य संगिनी: दुसरे सत्र-  दु. ०१.०० ते दु. ०२; कवी लोकनाथ यशवंत(नागपूर), सागर काकडे(पुणे), शेषराव धांडे (वाशिम) आणि नारायण पुरी (औरंगाबाद) कविता सादर करतील.मुलाखत: तिसरे सत्र-  दु. ०२.१५ ते दु. ०२.४५;  ज. वि. पवार(मुंबई), दिलीप मंडल (दिल्ली), सुरज एंगडे (अमेरिका), अमन कांबळे (नागपूर) यांच्या मुलाखती होतील.परिसंवाद: चवथे सत्र- दु. ३.०० ते ४.५५ वा. ; दयानंद माने (औरंगाबाद), सुकन्या सांथा(मुंबई), बी.व्ही.जोंधळे (औरंगाबाद), यशवंत भंडारे(औरंगाबाद) यांचा सहभाग.नाटक: पाचवे सत्र- 'तन माजूरी' या प्रेमानंद गज्वी लिखित व राहुल जोंधळे दिग्दर्शितीत नाटकाचे सादरीकरण (दु. ०४.३० ते ६.४५ वा.)  चर्चासत्र: सहावे सत्र- रविंद्र जोगदंड (औरंगाबाद), शिरीष बनसोडे, साहेबराव सदावर्ते(भोपाल), प्रदिप ढवळे, प्रफुल्ल शेंडे यांचा सहभाग ९ सायं. ०७.०० ते रात्री ०८.३० वा. ) कविता वाचन व सादरीकरण: सातवे सत्र- चरण जाधव(औरंगाबाद), वनश्री वनकर(वर्धा) आणि राजेंद्र गोणारकर यांच्या कवितांचे वाचन तर रॅप सिंगर विपीन तातड (अमरावती), शास्त्रीय संगीत रोहन कपाळे, सौरभ अभ्यंकर (अमरावती) यांच्यासादरीकरणानंतर कार्यक्रमाचा समारोप होईल.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद