--------------------------
कंपनीच्या पार्किंगमधून दुचाकी लांबविली
वाळूज महानगर : कंपनीच्या पार्किंगमधून कामगाराची दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम अशोक कीर्तिकर याने वाळूज एमआयडीसीतील इलेजेन्ट कोटिंग या कंपनीच्या पार्किंगमध्ये २६ एप्रिला दुचाकी (एम.एच.२०, सी.के.६३५६) उभी केली होती. चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली.
--------------------------------
पंढरपुरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
वाळूज महानगर : पंढरपुरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याने, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती वर्तविली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने कडक निर्बंध लावून संचारबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, व्यापारी व नागरिकाकडून या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. सकाळी पोलीस रस्त्यावर राहत नसल्याचा फायदा घेत व्यापारी पहाटेपासून दुकाने सुरू करीत असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी उसळत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याने, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
---------------------------
पाटोदा रस्त्यावर काटेरी झुडपे वाढली
वाळूज महानगर : पंढरपूर ते पाटोदा या तीन किलोमीटर रस्त्यावर काटेरी झुडपी वाढल्याने ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुतर्फा वेड्या बाभळीसह इतर झुडपे वाढली आहे. या काटेरी झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्याने ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वार व वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहेत. या रस्त्यावरील काटेरी झुडपाची छाटणी करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
-----------------------------