लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सकल मारवाडी युवा मंचच्या वतीने ‘मारवाडी आयडल सीझन- २’ या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, मराठवाड्यातील सकल मारवाडी समाजातील युवक-युवतींना सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.मागील वर्षी ‘मारवाडी आयडल’ स्पर्धा घेण्यात आली होती. देशातील अशा प्रकारची मारवाडी समाजातील ही पहिलीच स्पर्धा ठरली होती. या स्पर्धेला समाजातून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. व्यावसायिक गायकांच्या तोडीस तोड गीत सादर करून समाजातील युवक -युवतींनी आपली प्रतिभेची चुणूक दाखवून दिली होती. मात्र, मागील वर्षी ही स्पर्धा औरंगाबादपुरतीच मर्यादित होती. मात्र, युवा मंचने मराठवाडास्तरीय स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेत दोन गट पाडण्यात आले आहेत. पहिला गट १४ वर्षांखालील व दुसरा गट १५ वर्षांवरील असणार आहे. यात २३ ते २५ डिसेंबरदरम्यान आॅडिशन राऊंड यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. ७ जानेवारी २०१८ रोजी सेमीफायनल राऊंड भानुदासराव चव्हाण सभागृह, तर १३ जानेवारी रोजी फायनल राऊंड सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गायकांनी सकल मारवाडी युवा मंचच्या वेबसाईटवर आॅनलाइन फॉर्म भरावा, असे आवाहन अध्यक्ष आशिष अग्रवाल व प्रकल्पप्रमुख अॅड. जोगिंदरसिंह चौहान यांनी केले आहे.
मराठवाडास्तरीय मारवाडी आयडल स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:18 AM