शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

...त्यापेक्षा मीच राजीनामा देतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:19 AM

संतप्त झालेल्या कुलगुरूंनी निलंबित करता येत नाही, पुरावा नसताना निलंबन कसे करता येईल, उद्या मलाच तोंड द्यावे लागेल, त्यापेक्षा मीच राजीनामा देतो, असे उद्गार काढल्यामुळे सर्वच कार्यकर्ते आवाक् झाले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजी विभागात एका विद्यार्थ्याला प्रवेश नाकारल्यामुळे विद्यार्थी संघटनांचे सहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी बुधवारी कुलगुरूंशी संवाद साधला. कार्यकर्ते इंग्रजी विभागप्रमुखांच्या निलंबनासाठी अडून होते. तेव्हा संतप्त झालेल्या कुलगुरूंनी निलंबित करता येत नाही, पुरावा नसताना निलंबन कसे करता येईल, उद्या मलाच तोंड द्यावे लागेल, त्यापेक्षा मीच राजीनामा देतो, असे उद्गार काढल्यामुळे सर्वच कार्यकर्ते आवाक् झाले.विद्यापीठातील इंग्रजी विभागात प्रकाश पट्टेकर या विद्यार्थ्याला प्रवेशाचे पत्र दिल्यानंतर प्रवेश नाकारत जातिवाचक उल्लेख केल्याची तक्रार कुलगुरूंकडे करण्यात आली होती. तसेच याप्रकरणी विभागप्रमुख डॉ. गीता पाटील यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी केली होती. यासाठी प्रकाश पट्टेकर सहा दिवसांपासून प्रशासकीय इमारतीसमोर उपोषणाला बसला होता. त्याला रिपब्लिकन विद्यार्थी सेनेतर्फे सक्रिया पाठिंबा दिला होता. संघटनेतर्फे सहा दिवसांपासून आंदोलन करण्यात येत होते. विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्याला प्रवेश देण्यास तयार होते. मात्र, संघटना विभागप्रमुखांवर कारवाई करण्यासाठी आग्रही होती. यासाठी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन निकम, एसएफआयचे लोकेश कांबळे, रिपाइं आठवले गटाच्या युवक संघटनेचे कुणाल खरात, डॉ. किशोर वाघ यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी कुलगुरूंची दालनात भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.