शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पश्चिम महाराष्ट्राच्या ४६ टक्के क्षेत्रासाठी ७४ टक्के, तर मराठवाड्याला केवळ ८ टक्के पाणी

By बापू सोळुंके | Published: March 24, 2023 2:05 PM

‘आमचा हक्क,आमचं पाणी’: मराठवाड्याच्या वहितीलायक २७ टक्के क्षेत्रासाठी केवळ ८ टक्के पाणी

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचा एक प्रांत असलेल्या मराठवाड्याचा इतर प्रांतांसारखाच विकास करणे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांनी निधी वाटपात कायम अन्याय केल्याने मराठवाड्यातील प्रस्तावित अनेक धरणे निधीअभावी २० ते २२ वर्षांपासून अपूर्णच आहेत. परिणामी मागील २० वर्षांत म्हणावी तशी सिंचनक्षमता वाढलेली नाही. मराठवाड्यातील वहितीलायक २७ टक्के क्षेत्रासाठी केवळ ८ टक्के पाणी उपलब्ध आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील वहितीलायक ४६ टक्के क्षेत्रासाठी ७४ टक्के पाणी, तर विदर्भातील २७ टक्के क्षेत्रासाठी १८ टक्के पाणी उपलब्ध आहे.

मराठवाड्यातील ७० टक्के भाग कमी पर्जन्यमानाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. यामुळे मराठवाड्यातील एकूण क्षेत्रफळाच्या २७ टक्के क्षेत्रच वहितीलायक आहे. लहरी निसर्गावर अवलंबून असलेल्या या वहितीलायक क्षेत्राला बाराही महिने सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर मराठवाडा सुजलाम-सुफलाम होऊन विकास होईल. राज्यकर्त्यांना माहिती असूनही मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी भरीव निधी दिला गेला नाही. यामुळे अनेक सिंचन प्रकल्प २० वर्षांपासून अर्धवट आहेत. ते तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील सिंचनक्षम क्षेत्राचा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाशी तुलना केली तर मराठवाड्यातील पाण्याची भयावह स्थिती नजरेस पडते. मराठवाडा आणि विदर्भात २७ टक्के क्षेत्र वहितीलायक आहे. या दोन्ही प्रांतांमध्ये अनुक्रमे ८ टक्के आणि १८ टक्के पाणी उपलब्ध आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ४६ टक्के वहितीलायक क्षेत्रासाठी तब्बल ७६ टक्के पाणी उपलब्ध आहे. यावरून मराठवाड्यापेक्षा विदर्भात १० टक्के आणि पश्चिम महाराष्ट्राकडे ३८ टक्के पाणी अधिक आहे. या पाण्याचा प्रतिहेक्टर पाण्याचा विचार केला तर मराठवाडा खूप मागे असल्याचे दिसून येते. पश्चिम महाराष्ट्राकडे प्रतिहेक्टर ८ हजार ८०७ घनमीटर पाणी आहे. तर विदर्भाकडे प्रतिहेक्टर ३६१६ घनमीटर पाणी असल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. मराठवाड्याला केवळ १७२९ घनमीटर प्रतिहेक्टर पाणी उपलब्ध आहे.

आंतरराष्ट्रीय मानकानुसार मराठवाडा अतिदुष्काळी क्षेत्रातआंतरराष्ट्रीय मानकानुसार प्रतिमाणशी १ हजार ते १७ हजार घनमीटर पाणी मिळणे आवश्यक आहे. तर ५०० घनमीटर प्रतिमाणशी यापेक्षा कमी पाणी उपलब्ध झाल्यास तो भाग अतिदुष्काळी म्हणून ओळखला जातो. उर्वरित महाराष्ट्रात प्रतिमाणशी १ हजार ३४६ घनमीटर, तर विदर्भाला ९८५ घनमीटर प्रतिमाणशी पाणी उपलब्ध आहे. मराठवाड्यात प्रतिमाणशी सर्वांत कमी ४३८ घनमीटर पाणी मिळते.

महाराष्ट्राची दुष्काळजन्य स्थितीपश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र-- ५० टक्के क्षेत्रविदर्भ--------५० टक्केमराठवाडा------ ७० टक्के

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद