शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

कम्बाइन बँकर्सची मनपावर निसटती मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 1:00 AM

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत कम्बाइन बँकर्स संघाने मनपा संघावर ४ चेंडू व २ गडी राखून चित्तथरारक विजय मिळवला. दुसºया सामन्यात उदय पांडेच्या तडाखेबंद ९५ धावांच्या बळावर कॉस्मो फिल्म संघाने एसजीएसटी संघावर ४१ धावांनी मात केली.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत कम्बाइन बँकर्स संघाने मनपा संघावर ४ चेंडू व २ गडी राखून चित्तथरारक विजय मिळवला. दुसºया सामन्यात उदय पांडेच्या तडाखेबंद ९५ धावांच्या बळावर कॉस्मो फिल्म संघाने एसजीएसटी संघावर ४१ धावांनी मात केली.सकाळच्या सत्रात उदय पांडे याच्या ६३ चेंडूंतील १२ चौकार व ३ षटकारांसह फटकावलेल्या ९५ धावांच्या बळावर कॉस्मो फिल्मने फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १९६ धावा ठोकल्या. हसन अस्लम याने ३० चेंडूंत ३४ धावा केल्या. एसजीएसटी संघाकडून अशोक सूर्यवंशी याने २, तर विशाल गवळे, अभय कमरकर व धनंजय देशमुख यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात एसजीएसटी संघ ५ बाद १५५ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून विशाल गवळे याने ३५ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ५५ धावा केल्या. सय्यद शुजाने ३९ व अभय करमरकरने नाबाद २३ धावा केल्या. कॉस्मो फिल्मकडून सतीश जामखेडकर, उदय पांडे, महेंद्र ढगे, विराज चितळे व श्रीकांत वाघमारे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुसºया सामन्यात मनपाने प्रथम फलंदाजी करीत २० षटकांत ७ बाद १२१ धावा केल्या. त्यांच्याकडून सचिन लव्हेराने ६ चौकारांसह ३७ व राम प्रधानने नाबाद १७ व मोहमद इम्रान व कर्मवीर लव्हेरा यांनी प्रत्येकी १५ धावा केल्या. कम्बाइन बँकर्सकडून दिनेश कुंटे व शेख हबीब यांनी प्रत्येकी २, तर प्रदीप जगदाळे व मिलिंद पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात दिनेश कुंटेच्या ३१ चेंडूंतील ५ चौकारांसह जिगरबाज नाबाद ३७ धावांच्या खेळीच्या बळावर कम्बाइन बँकर्सने ८ गडी गमावून १९.२ षटकांत १२२ धावा करीत विजय मिळवला. प्रदीप जगदाळेने १८ चेंडूंत ३ चौकार, २ षटकारांसह २७, मिलिंद पाटीलने ११ व महेंद्रसिंग कानसाने नाबाद ९ धावा केल्या. मनपाकडून राम प्रधान, रईस अहमद व अल्ताफ यांनी प्रत्येकी २, तर प्रवीण क्षीरसागरने १ गडी बाद केला.