- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : दूधापाठोपाठ मंगळवारपासून (दि. २२) घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल एवढेच नव्हे तर सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. याचा अंतिम फटका ग्राहकांच्या खिशाला बसणे सुरू झाले. या दरवाढीने गेल्या २४ तासांपासून शहरवासीयांच्या खिशातून दररोज अतिरिक्त २८ लाख रुपये काढून घेतले जाणार आहेत.
घरगुती गॅस महागलानवीन वर्षात पहिल्यांदाच २२ मार्च रोजी थेट ५० रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत.महिना २०२२ घरगुती गॅस व्यावसायिक गॅसजानेवारी ९०८.५० रु २०३५ रुफेब्रुवारी ९०८.५० रु १९४३.५० रुमार्च ९५८.५० रु २०४१ रु
आजघडीला १० लाख घरगुती गॅस सिलिंडरधारक आहेत. ५० रुपये भाव वाढल्याने महिन्याकाठी ५ कोटी तर दररोज १७ लाख रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरमागे ९३.५० रुपये वाढले.
पेट्रोल, डिझेल, सीएनजीमध्ये वाढपेट्रोल, डिझेल, सीएनजीमध्ये दररोज ५ लाख ४० हजार जास्त द्यावे लागत आहेत. पेट्रोल व डिझेलचे भाव लीटरमागे अनुक्रमे ८५ पैसे व ८६ पैशांची मंगळवारी वाढ झाली आहे. तर सीएनजी किलोमागे २ रुपयांनी महागला आहे.
महिना २०२२ पेट्रोल (लीटर) डिझेल सीएनजी (किलो)जानेवारी १११.६६ रु ९५.८२ रु ७९.९५ रुफेब्रुवारी १११.६६ रु ९५.८२ रु ७९.९५ रु२२ मार्च ९५८.५० रु ९६.६८ रु ८१.९५ रु
दररोज शहरात अडीच लाख लीटर पेट्रोल व डिझेल दीड लाख लीटर, तर सीएनजी २० हजार किलो विकले जाते. तिन्ही मिळून दररोज वाहनधारकांच्या खिशातून ५२,२५०० रुपये जास्त जात आहेत.
तीन लाख लीटर दुधाचा खपशहरात लीटरमागे २ रुपयांनी दूध महागले आहे. सध्या पाकीटमधील दूध कमीत कमी ४८ रुपये लीटरने विकले जाते.महिना रुपये (लीटर)जानेवारी ४६ रु.फेब्रुवारी ४६ रु.मार्च ४८ रु.
शहरात दररोज तीन लाख लीटर दुधाची विक्री होते. यात पाकीट व सुट्या दुधाचा समावेश आहे. दोन रुपयांनी दूध वाढल्याने दररोज ६ लाख रुपये शहरवासीयांच्या खिशातून जास्तीचे जात आहेत.
दुधाचा पुरवठा घटलादुधाचा पुरवठा घटला आहे. तसेच पशुखाद्य महागले आहे. यामुळे आम्ही गोपालकांना एका लीटरमागे १ रुपया वाढून दिला आहे. परिणामी ग्राहकांना लीटरमागे २ रुपये जास्तीच्या दराने दूध खरेदी करावे लागत आहे.
ग्राहकांना, वितरकांनाही फटकाजसजसे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढतात तसा ग्राहकांना फटका बसतोच, पण वितरकांची गुंतवणूक वाढते व कमिशनमध्ये मात्र वाढ होत नाही. डिझेल शहराबाहेर जास्त विकले जाते. ई-वाहने व सीएनजीचा परिणामही पेट्रोल, डिझेलवर होऊ लागला आहे.- अखिल अब्बास, सचिव, पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन